
Malegaon Sugar Factory Election : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. 22 जून रविवारी सहकारी साखर कारखान्यासाठी मतदान होणार आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व शक्ती पणाला लावल्याच पाहिला मिळत आहे. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या बारामती तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या रणधुमाळीत आता रंग चढताना पाहिला मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे स्वतः मीच या कारखान्याचा चेअरमन असल्याची घोषणा त्यांनी भर सभेत केलीय. त्यानंतर विरोधकांकडूनही त्यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला आहे.
‘माळेगाव कारखान्याचे भलं करायची धमक फक्त माझ्यातच’
या सभेत अजित पवार म्हणाले की, माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे भलं करायच असेल तर अजित पवारच करू शकतो. कारखानदारी अडचणीत आहे आपल्या वाड वडिलांनी उभे केलेले कारखानदारी कोणाच्या हातात द्यायची तर अजित पवारच्या हातात द्यायची, असे म्हणत पवारांच्या पॅनलमधून चेअरमन कोण होणार अशी चर्चा होते नाव जाहीर करण्याचं बोललं जात होतं. आज अजित पवारांनी भर सभेत चेअरमन मीच होणार असं पाहुणेवाडी येथील प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर जाहीर सभेत घोषित केल आहे. माळेगाव सहकारी साखर कारखान्याची संचालक पदाची निवडणूक यंदा चौरंगी होणार आहे.
‘ते उद्या काटेवाडीचे पोलीस पाटीलही होतील’
सहकार बचाव शेतकरी पॅनलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांनी अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल केलाय. तुमच्या घरात 3 खासदार, 2 आमदार आहेत तरीदेखील तुम्हाला आता कारखान्याचे चेअरमनपद पाहिजे म्हणत घणाघात केलाय. खासदारकी, आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस माझे वय दिसत नाही मात्र कारखान्याची निवडणूक लागली की माझ्या 85वर्षाच्या वयाचा मुद्दा काढतात. उद्या त्यांच्या काटेवाडी गावचे पोलीस पाटील देखील अजित पवार होतील असा निशाणा चंद्रराव तावरे यांनी साधला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.