digital products downloads

Chhagan Bhujbal : भाजीविक्रेता ते मंत्रीमंडळात सहभाग; असा आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास

Chhagan Bhujbal : भाजीविक्रेता ते मंत्रीमंडळात सहभाग; असा आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास

Chhagan Bhujbal : राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडेंनी राजीनामा दिल्यानंतर मंत्रीमंडळात  राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांची वर्णी लागली आहे.  मुंबईत राजभवनात 20 मे 2025 मंगळवारी सकाळी 10 वाजता शपथविधी होणार आहे. महायुतीच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने छगन भुजबळ नाराज होते अशी चर्चा होती. आता त्यांना मंत्रीपद देऊन नाराजी दूर करण्याचा हा प्रयत्न असल्याच बोलं जातंय. 

भाजीविक्रेता ते मंत्रीमंडळात सहभाग!

छगन भुजबळ यांनी 1960 च्या दशकात नव्याने स्थापन झालेल्या शिवसेनेतून आपली राजकीय कारकीर्द सुरू केली. राजकारणात येण्यापूर्वी ते मुंबईतील भायखळा मार्केटमध्ये भाजी विकायचे.

 
त्यांच्या आईचा लहानसा गाळा होता.1973 मध्ये त्यांनी पहिल्यांदा शिवसेनेकडून नगरसेवकपदासाठी निवडणूक लढवली, त्यात ते विजयी झाले. 1973 ते 1984 या काळात ते मुंबई महापालिकेत विरोधी पक्षनेते होते.त्यानंतर 1985 मध्ये महापौर झाले.

Chhagan Bhujbal : भाजीविक्रेता ते मंत्रीमंडळात सहभाग; असा आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास

1991मध्ये बाळासाहेबांशी मतभेद झाल्यानंतर भुजबळांनी शिवसेना सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 1999 मध्ये त्यांनी काँग्रेसपासून वेगळे झाले आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सरकारमध्ये त्यांना प्रथमच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री करण्यात आले.

Chhagan Bhujbal : भाजीविक्रेता ते मंत्रीमंडळात सहभाग; असा आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास

 
जन्म आणि शिक्षण : छगन भुजबळ यांचा जन्म 15ऑक्टोबर1947 रोजी नाशिक येथे झाला. त्याने मुंबईतील एका अभियांत्रिकी शाळेतून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी घेतली आहे. सुरुवातीच्या काळात ते शेती आणि संबंधित व्यवसाय करायचे. त्यांना लहानपणापासूनच राजकारणाची आवड होती.

Chhagan Bhujbal : भाजीविक्रेता ते मंत्रीमंडळात सहभाग; असा आहे छगन भुजबळ यांचा राजकीय प्रवास

महाराष्ट्र सदन घोटाळा आणि मनी लॉंडरिंग प्रकरणी छगन भुजबळ यांना 14 मार्च 2016 रोजी अटक करण्यात आली होती. मुंबईतील एन्फोर्समेंट डिरेक्टरेटच्या कार्यालयात झालेल्या 11 तासांच्या मॅरेथॉन चौकशीनंतर त्यांना ही अटक करण्यात आली होती.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp