digital products downloads

CM देवेंद्र फडणवीसांचं निवेदन का नाकारलं? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले ‘अशांना निवडणुकीत…’

CM देवेंद्र फडणवीसांचं निवेदन का नाकारलं? शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले ‘अशांना निवडणुकीत…’

Sharad Pawar Denies Devendra Fadnavis Request: माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांनी अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे आता देशाला नवे उपराष्ट्रपती मिळणार असून, त्यासाठी 9 सप्टेंबर रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीत भाजप प्रणित आघाडी एनडीएकडून महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सी पी राधाकृष्णन तर इंडिया आघाडीकडून सुदर्शन रेड्डी मैदानात आहेत. महाराष्ट्रात या निवडणुकीची जबाबदारी मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्यावर सोपवण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशी संपर्क साधत सी पी राधाकृष्णन यांना शिवसेना ठाकरे गट आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाने पाठिंबा द्यावा असं आवाहन केलं. मात्र त्यांचं हे निवेदन शरद पवार यांनी थेट नाकारले.

महाराष्ट्राचे माजी राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार आहेत, त्यांनी महाराष्ट्रच राज्यपाल पद भूषवल्यामुळे त्यांना राज्यातील प्रमुख पक्षांनी मतदान दिले पाहिजे, अशी भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. त्यासाठी त्यांनी फोनवरून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा देखील केली. मात्र शरद पवार यांनी समर्थन देण्यास थेट नकार दिला. 

 

सीपी राधाकृष्णन यांना समर्थन का देणार नाही? याबाबत शरद पवार म्हणाले, इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून सुदर्शन रेड्डी यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. NDA एनडीएचे उमेदवार सीपी राधाकृष्णन यांना मतदान करा यासाठी मुख्यमंत्र्यांचा फोन आला होता, मात्र मी नकार दिला अशी माहिती त्यांनी दिली. 

शरद पवार पुढे म्हणाले, “झारखंड हे आदिवासींचं राज्य आहे. झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्यावर गुन्हा दाखल झाला तेव्हा सोरेन राज्यपालांकडे भेटीसाठी गेले होते. तेव्हा त्या राज्याचे राज्यपाला सीपी राधाकृष्णन होते. तेव्हाच यंत्रणांच्या अधिकाऱ्यांनी सोरेन यांना पाचारण केले. राज्यपालांसमोर एका मुख्यमंत्र्याला अटक झाली. सोरेन यंत्रणांना म्हणत होते मला घरातून अटक करा, रस्त्यावरून अटक करा, मात्र राजभवनातून अटक करू नका. तरीदेखील त्यांना अटक झाली. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांच्यासमोर यंत्रणांनी सोरेन यांना अटक केली. अशाप्रकारे सत्तेचा गैरवापर झाला, अशांना निवडणुकीत समर्थन देण्याची अपेक्षा करणे योग्य नाही”. 

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याशी समर्थनाबाबत चर्चा केली असून शरद पवार यांनी नकार दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही सांगितलं आहे. तर उद्धव ठाकरे पक्षांतर्गत चर्चा करतील असंही त्यांनी सांगितलं. 

“सीपी राधाकृष्णन यांनी राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी सांभाळली आहे, त्यामुळे ते महाराष्ट्राचे मतदार आहेत. अशावेळी महाराष्ट्रातील प्रमुख पक्षांनी त्यांना मतदान केले पाहिजे,” असे मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं होतं. मात्र झारखंडचे राज्यपाल असताना त्यांच्यासमोर मुख्यमंत्री असलेल्या हेमंत सोरेन यांना अटक झाली हा सत्तेचा गैरवापर तसेच हे आमचे विचार नाही असं म्हणत पवार यांनी फडणवीसांनी केलेली विनंती फेटाळून लावली आहे. 

FAQ

1) उपराष्ट्रपती निवडणूक 2025 कधी होणार आहे?
भारताची 17वी उपराष्ट्रपती निवडणूक 9 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. मतमोजणी त्याच दिवशी होऊन निकाल जाहीर होईल. नामांकनाची अंतिम तारीख 21 ऑगस्ट 2025 आहे, तर नामांकन छाननी 22 ऑगस्ट 2025 रोजी होईल. उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख 25 ऑगस्ट 2025 आहे.

2) ही निवडणूक का घ्यावी लागत आहे?
माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी 21 जुलै 2025 रोजी प्रकृतीच्या कारणास्तव राजीनामा दिला. भारतीय संविधानाच्या कलम 68(2) नुसार, उपराष्ट्रपती पद रिक्त झाल्यास शक्य तितक्या लवकर निवडणूक घ्यावी लागते. ही 1987 नंतरची पहिली अकाली निवडणूक आहे.

3) एनडीए आणि इंडिया आघाडीचे संसदेतील संख्याबळ काय आहे?
सध्याच्या संसदेतील संख्याबळानुसार, एनडीएचे 425 मतदार आहेत (लोकसभेत 293, राज्यसभेत 129), तर इंडिया आघाडीकडे 312 मतदार आहेत. वायएसआरसीपी आणि बिजेडी यांसारखे पक्ष एनडीएला पाठिंबा देऊ शकतात, त्यामुळे एनडीएचा उमेदवार निवडून येण्याची शक्यता जास्त आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp