digital products downloads

CM फडणवीस अजित पवारांवर नाराज? IPS अंजना कृष्णा यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय – सूत्र

CM फडणवीस अजित पवारांवर नाराज? IPS अंजना कृष्णा यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याचा निर्णय – सूत्र

Devendra Fadnavis on Ajit Pawar – IPS Anjana Krishna: उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातील व्हायरल ऑडिओ कॉलची दखल स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस या प्रकरणावरुन नाराज असून, आपली नाराजी अजित पवारांकडे बोलून दाखवली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्या पाठीशी ठामपणे उभं राहणार असल्याचा विश्वासही व्यक्त केला आहे. 

Add Zee News as a Preferred Source

 

कुर्डू मुरुम प्रकरणावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवारांवर नाराज आहेत. मुख्यमंत्री फडणवीसांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती मिळत आहे. व्हिडिओमुळे सरकारची प्रतिमा मलिन झाल्याचं मत त्यांनी अजित पवारांसमोर बोलून दाखवली आहे. महिला अधिका-याच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. फडणवीसांच्या खंबीर भूमिकेमुळे अजित पवारांचं एक पाऊल मागे आल्याचं सूत्रांकडून समजत आहे. 

नेमकं प्रकरण काय?

माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर  करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. यादरम्यान नागरिक आणि अंजना कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता बाबा जगताप याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला आणि अंजना कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवारांचा आवाज ओळखता आला नाही. अजित पवारांनी यावेळी दोनवेळा मी उपमुख्यमंत्री बोलत आहे असं सांगितलं. ‘मै DCM बोल रहा हू. ‘ये कारवाई बंद करो…मेरा आदेश हैं..’, असं अजित पवारांनी सांगितलं. त्यावर अंजली कृष्णा म्हणाल्या, “मेरे फौन पर कॉल करे”. त्यावर अजित पवार रागावून म्हणले की, “तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी. मेरा चेहरा तो पेहचानोगा ना”. 

 

यानंतर अजित पवारांनी व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर अंजना कृष्णा यांनी बांधावर जाऊन पवारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी त्यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. माझा फोन आला आहे, तहसीलदारांना सांगा असं पवार म्हणाले. 

कोण आहेत अंजना कृष्णा?

अंजना कृष्णा यांचं पूर्ण नाव अंजना कृष्णा व्हीएस आहे. त्या भारतीय पोलिस सेवा (IPS) अधिकारी आहेत, ज्या सध्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे पोलिस उपअधीक्षक (DSP) म्हणून कार्यरत आहेत. आपल्या प्रामाणिक आणि कठोर कार्यशैलीसाठी त्या ओळखल्या जातात. 2022-23 मध्ये त्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी AIR-355 रँक मिळवला होता.

 

अंजना कृष्णा यांचा जन्म केरळमधील तिरुअनंतपुरम येथे झाला. त्यांचे वडील बिजू यांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे, तर आई सीना कोर्टात टायपिस्ट म्हणून काम करतात. त्यांचे प्राथमिक शिक्षण पूजापुरा येथील सेंट मेरीज सेंट्रल स्कूलमधून आणि उच्च शिक्षण तिरुअनंतपुरम येथील एचएचएमएसपीबी एनएसएस कॉलेज फॉर वुमनमधून झाले. अंजना कृष्णा यांची गणना कुशाग्र आणि प्रामाणिक आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये केली जाते.

FAQ

1) व्हिडिओ कसा व्हायरल झाला आणि का?
व्हिडिओ कार्यकर्त्यांनी स्पीकरवर ठेवून रेकॉर्ड केला आणि सोशल मीडियावर (X, फेसबुक) अपलोड केला. तो ४ सप्टेंबर २०२५ रोजी व्हायरल झाला. कारण: ते एका तरुण महिला आयपीएस अधिकाऱ्याला धमकावण्यासारखे वाटले आणि अवैध खननाच्या संरक्षणाचा आरोप झाला. लाखो व्ह्यूज मिळाले आणि #AnjanaKrishna #AjitPawar ट्रेंड झाले.

2) राजकीय प्रतिक्रिया काय आहे?
विपक्ष (शिवसेना-यूबीटी, एनसीपी-शरद पवार गट): संजय राऊत यांनी “अवैध खननाचे संरक्षण” असा आरोप केला आणि केंद्रीय गृहमंत्र्यांकडे संरक्षणाची मागणी केली. सुप्रिया सुळे यांनी “संविधानावर हल्ला” म्हटले. रोहित पवार यांनी “अजितदादांचा बोलण्याचा प्रकार चुकीचा समजला गेला” असे म्हटले. 

एनसीपी (अजित गट): सुनील तटकरे यांनी “व्हिडिओ जाणीवपूर्वक लीक केला” असे म्हटले. अमोल मिटकरी यांनी सुरुवातीला अंजना यांच्या शैक्षणिक आणि जाती प्रमाणपत्रावर शंका उपस्थित केली, पण नंतर माफी मागितली आणि ट्विट काढले. 

भाजप: चंद्रशेखर बावनकुळे यांनी “अजितदादा अधिकारी फटकारत नाहीत” असे म्हटले. 

3) अजित पवार यांचे स्पष्टीकरण काय?
५ सप्टेंबर २०२५ रोजी अजित पवार यांनी X वर पोस्ट करून सांगितले: “माझा हेतू कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करणे नव्हता, तर तणावपूर्ण वातावरण शांत करण्याचा होता. मी पोलिस दलाला, विशेषतः महिला अधिकाऱ्यांना आदर देतो. अवैध खननावर कठोर कारवाई होईल.” त्यांनी पारदर्शक शासनाची वचनबद्धता दर्शवली. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp