
Buldhana Crime News : विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर ते मोताळा रोडवर दिवसाढवळा धक्कादायक घटना घडली आहे. दिवसाढवळ्या एका 14 वर्षीय शाळेकरी मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. 3 नराधम स्विफ्ट कारमधून आले आणि त्यांनी अपहरणाच्या उद्देशाने 14 वर्षीय शाळेकरी मुलीच्या चेहऱ्यावर स्प्रे मारला. तिला बेशुद्ध करुन तिला बळजबरी कारमध्ये अपहरण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
पण परिसरातील नागरिकांच्या सतर्कतेमुळे आरोपींचा डाव फसला आहे. डाव फसल्यानंतर नराधमांनी तिथून पळ काढला पण नागरिक आणि पोलिसांच्या सर्तकतेमुळे बुलढाण्याच्या दिशेने निघालेल्या कारचा पाठलाग करत मोताळा इथे अपहरणकर्त्यांची कार अडवून त्यांना अटक करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, काही अज्ञात आरोपींनी रस्त्यावरून जाणाऱ्या 14 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला गाठले. तिला बेशुद्ध करण्याच्या उद्देशाने त्यांनी तिच्या तोंडावर स्प्रे मारला आणि जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला. घटनास्थळावर उपस्थितीत लोकांनी सांगितलं की, 14 वर्षीय विद्यार्थिनीसह तीन शालेय विद्यार्थ्यांचे अपहरणाचा हा प्रयत्न होता. ही घटना शहरात सकाळी साडेआठ वाजताच्या सुमारास मलकापूर शहरात घडली.
हा अपहरणाचा प्रयत्न सुरू असतानाच स्थानिक नागरिकांच्या ही गोष्ट लक्षात आली. नागरिकांनी तात्काळ तत्परता दाखवत आरोपींच्या कारचा पाठलाग केला. पाठलागानंतर जमावाने या तिन्ही आरोपींना पकडले. यावेळी संतप्त जमावाने त्यांना चांगलाच चोप दिला, तसंच त्यांच्या कारची तोडफोड केली. सिनेस्टाइल अपहरण आणि त्यानंतरच्या थरारामुळे जिल्ह्यात एकच खळबळ माजली आहे.
मारहाणीनंतर नागरिकांनी या आरोपींना बोरखेडी पोलिसांच्या स्वाधीन केले. प्राथमिक माहितीनुसार, पकडलेल्या 3 आरोपींपैकी 2 जण बीड जिल्ह्यातील, तर 1 आरोपी उत्तर प्रदेशातील आहे. अपहरण नेमके कोणत्या उद्देशाने करण्यात येत होतं, यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
FAQ
प्रश्न 1: ही घटना कुठे आणि कधी घडली?
उत्तर: ही धक्कादायक घटना बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर ते मोताळा रोडवर दिवसाढवळ्या घडली. १४ वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्याचा प्रयत्न झाला.
प्रश्न 2: अपहरणाचा प्रयत्न कसा झाला?
उत्तर: अज्ञात आरोपींनी रस्त्यावरून जाणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीला गाठले. तिला बेशुद्ध करण्यासाठी तोंडावर स्प्रे मारला आणि जबरदस्तीने कारमध्ये बसवण्याचा प्रयत्न केला.
प्रश्न 3: नागरिकांनी काय केले?
उत्तर: स्थानिक नागरिकांना ही गोष्ट लक्षात आली. त्यांनी तत्काळ आरोपींच्या कारचा पाठलाग केला, तिघा आरोपींना पकडले आणि संतप्त जमावाने त्यांना चोप दिला. तसेच, कारची तोडफोड केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.