
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मतदार याद्यांमधील कथित गैरप्रकारावरून निवडणूक आयोगाचा खरपूस समाचार घेतला आहे. या प्रकरणी त्यांनी आयोगाने काँग्रेस नेते राहुल गांधी यांना बजावण्यात आलेली नोटीस म्हणजे ‘गिरे तो भी
.
बिहार विधानसभेची निवडणूक लवकरच होणार आहे. या हिंदी भाषिक राज्यात मतदार यादींच्या फेरतपासणीवरून मोठे रान पेटले आहे. निवडणूक आयोगाने येथील लाखो मतदारांची नावे मतदार यादीतून वगळले आहेत. या प्रकरणी आयोगाने सुप्रीम कोर्टात एक प्रतिज्ञापत्र दाखल करून वगळलेल्या मतदारांची यादी जाहीर करण्यास आपण बांधिल नसल्याचे सांगितले आहे. तत्पूर्वी, त्यांनी राहुल गांधी यांनी मतचोरीसंबंधी आयोगावर केलेल्या आरोपांचे जोरदार समर्थन केले. या पार्श्वभूमीवर रोहित पवार यांनी आयोगावर निशाणा साधला आहे.
निवडणूक आयोग काय लपवत आहे?
रोहित पवार सोमवारी आपल्या पोस्टमध्ये म्हणाले, स्वायत्त संस्था असलेल्या निवडणूक आयोगाने कुणाच्या मनाप्रमाणे नाही तर पाठीचा कणा असल्याप्रमाणे निष्पक्ष राहणं अपेक्षित आहे, पण लोकसभेतील विरोधी पक्षनेते मा. राहुल जी गांधी यांनी निवडणूक आयोगाच्या मतचोरीचा जाहीर पंचनामा केला. तरीही आयोग मात्र धुतल्या तांदळासारखा स्वच्छ असल्याचा आव आणत उलट राहुल जी गांधी यांच्याकडंच शपथपत्राची मागणी करतोय. हे म्हणजे, ‘गिरे तो भी टांग उपर’, असला प्रकार आहे आणि आता तर वगळलेल्या मतदारांची यादी प्रसिद्ध करण्यास बांधिल नसल्याचं प्रतिज्ञापत्र सुप्रीम कोर्टात देऊन निवडणूक आयोग नेमकं काय लपवत आहे? आणि कुणासाठी लपवत आहे? कुठे टी. एन. शेषन साहेब आणि कुठं आजचा निवडणूक आयोग, असे रोहित पवार म्हणालेत.
संविधान हटवणे हाच भाजपचा अजेंडा
उल्लेखनीय बाब म्हणजे रोहित पवार यांनी गत आठवड्यात संविधान हटवणे हाच भाजप व मनुवादी विचारांचा खरा अजेंडा असल्याचा आरोप केला होता. ते म्हणाले होते, संविधान हटवणं हाच भाजपचा आणि मनुवादी विचारांचा खरा अजेंडा राहिला असून वादग्रस्त तथाकथित गुरुजींची पात्रे त्यासाठीच उभी केली गेली आहेत. तिरंगा झेंडा, संविधानाची मुलभूत तत्वे यावर या वादग्रस्त लोकांकडून जाणीवपूर्वक वादग्रस्त वक्तव्ये करवून घेतली जातात आणि जनमताची प्रतिक्रिया जाणून घेण्याचं काम करून घेतलं जातं.
संतानी दिलेला समता, मानवता व सामाजिक न्यायाचा, शिव-फुले-शाहू-आंबेडकरांचा विचार संपवण्यासाठी, संविधान संपवण्यासाठी छुपा अजेंडा चालवणाऱ्या या वादग्रस्त गुरुजीसारख्यांच्या हजार पिढ्या जन्माला आल्या तरी संविधान कुणी संपवू शकणार नाही, हे वादग्रस्त गुरुजींच्या मनुवादी मालकांनी लक्षात घ्यावं. सर्वसामान्यांच्या हक्कांना, महिलांच्या हक्कांना डावलणं हाच आधार असलेल्या मनुवादी विचाराला नेहमीच आमचा विरोध आहे, असे ते म्हणाले होते.
हे ही वाचा…
देवेंद्र फडणवीस हे EC च्या दरोड्यातील लाभार्थी:संजय राऊत यांचा घणाघात; निवडणूक आयोग हा दुतोंडी गांडूळ असल्याचाही केला आरोप
मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक आयोगाच्या दरोड्यातील एक लाभार्थी असल्याचा घणाघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना केला. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी निवडणूक आयोगाचे प्रवक्तेपद स्वीकारले आहे का? ते आयोगाच्या दरोड्याचे लाभार्थी आहेत. त्यामुळे ते आयोगाची बाजू घेत आहेत, असे त म्हणालेत. वाचा सविस्तर
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.