
Eknath Khadse : एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकरबद्दल महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी गंभीर आरोप केले. त्यानंतर झी 24 तासावर एकनाथ खडसे यांनी आपली प्रतिक्रिया दिली. झी 24 तासशी बोलताना एकनाथ खडसे यांनी बहुचर्चित सीडीबद्दलही मोठा गौप्यस्फोट केला आहे. (eknath khadse this person was going to give me a cd but Pranjal Khewalkar Rupali Chakankar news in marathi)
एकनाथे खडसे जावई प्रांजल खेवलकरबद्दल काय म्हणालेत?
जावयावरील ‘सेक्स स्कँडल’वर खडसे म्हणाले की, रुपाली चाकणकर यांना पोलिसांनी काही माहिती दिली का? त्यांच्याकडे काही पुरावे आहेत का? पोलिसांनी यासंदर्भात काही माहिती दिलेले नाहीत. रुपाली चाकणकर यांच्याकडे ही सगळी माहिती आली कुठून. रुपाली चाकणकर या तपास अधिकारी नाहीत. मग त्यांच्याकडे एवढी माहिती आली तरी कुठून? रोहिणी आणि रुपाली यांची चांगले प्रेमाचे संबंध असल्याने रुपाली यांनी या प्रकरणात हस्तक्षेप सुरु केला. यासंदर्भात कोणा महिलेची तक्रार आहे का? बलात्कार किंवा विनयभंग केल्याची तक्रार आहे का? तक्रार असेल तर पोलिसांनी गुन्हाची नोंद करुन पोलिसांनी सर्व गोष्टी समोर आणल्या पाहिजे.
ते पुढे म्हणालेत की, रुपाली यांना कोणताही अधिकार नसताना अशा प्रकारे पत्रकार परिषद घेऊन कोणाच्या खाजगी आयुष्यात डोकावू नये. मी इथे खाजगी आयुष्य यासाठी म्हणतोय की, जोपर्यंत गुन्ह्याची नोंद होत नाही, तोपर्यंत ते सार्वजनिक करायला नको.
एकनाथ खडसेंची ती सीडी कोणाकडे?
तुम्ही ईडी लावाली तर मी सीडी लावणार, आपल्या या वक्तव्यावर बोलताना त्यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रफुल लोढा हाचं मला सीडी देणार होता, म्हणून तुम्ही ईडी लावाल तर मी सीडी लावणार होतो, मात्र त्यांनी मला सीडी दिली नाही, आणि आता ते अटकेत आहे, म्हणून नाथाभाऊ बदनाम झाले असं खडसे यांनी यावेळी म्हटलं आहे. दरम्यान पुढे बोलताना ते म्हणाले की, गिरीश महाजन यांनी माझं चॅलेंज स्वीकारावं, प्रफ्फुल लोढाची नार्कोटेस्ट करावी, महाजनांच्या संपत्तीची चौकशी व्हावी अशी मागणीही यावेळी खडसे यांनी केली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.