
Bala nandgaonkar Interview: महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातील वाढत्या जवळीकीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून ठाकरे बंधू, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे, यांच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला आहे. आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत दोन्ही पक्षांनी एकत्र येऊन लढण्याचा निर्णय घेतला आहे, ज्यामुळे ही जवळीक ठळकपणे समोर आली आहे. दरम्यान मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीत 2017 ची आठवण सांगताना उद्धव ठाकरेंना चिमटा काढलाय. नेमकं काय म्हणाले बाळा नांदगावकर? सविस्तर जाणून घेऊया.
‘टू द पॉईंट’ मुलाखतीत बाळा नांदगावकरांनी उद्धव ठाकरेंना चिमटा काढला. 2017 साली शिवसेना मोठ्या उंचीवर होती, उंचीमुळं उद्धव ठाकरेंनी युतीचा प्रस्ताव नाकारला. पण आता उद्धव ठाकरेंना समान पातळीवर आल्याचं वाटलं असेल असे ते म्हणाले.
युती म्हटलं की मोठा भाऊ, छोटा भाऊ हे आलंच. तुमच्या अशी चर्चा झालीय का? असा प्रश्न बाळा नांदगावकर यांना विचारण्यात आला. त्यावेळी बाळा नांदगावकर यांनी बोलताना जुनी आठवण सांगितली. 2017 ला पालिका निवडणुकीला आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो. मोठा भाऊ तुम्ही, छोटे भाऊ आम्ही, असाच तो प्रस्ताव होता. पण त्यावेळी ऊंचीवर होते. आम्ही खाली होते. आता त्यांना जाणिव झाली असावी, असे नांदगावकर म्हणाले.
‘संपलेल्या पक्षावर आम्ही बोलत नाहीत’असे विधानदेखील ठाकरेंच्या शिवसेनेकडून आले होते. यावर निवडणुकीवेळी अशी विधाने येत असतात. त्याचे वाईट वाटून घ्यायचे नसते. आम्हीदेखील निवडणूक काळात अशी विधान करतो, असे बाळा नांदगावकर म्हणाले.
FAQ
१. मनसे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्यातील जवळीक कशामुळे चर्चेत आहे?
महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांनी आगामी बेस्ट कामगार पतपेढी निवडणुकीत (१८ ऑगस्ट २०२५) एकत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. उद्धव आणि राज ठाकरे यांच्या भेटी आणि संयुक्त मेळाव्यामुळे युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.
२. बाळा नांदगावकर यांनी ‘टू द पॉइंट’ मुलाखतीत काय म्हटले?
झी २४ तासच्या ‘टू द पॉइंट’ मुलाखतीत बाळा नांदगावकर यांनी २०१७ च्या पालिका निवडणुकीची आठवण सांगत उद्धव ठाकरेंना चिमटा काढला. त्यांनी सांगितले की, २०१७ मध्ये शिवसेना उंचीवर होती आणि मनसेने युतीचा प्रस्ताव दिला होता, पण उद्धव यांनी तो नाकारला. आता उद्धव यांना समान पातळीवर आल्याची जाणीव झाली असावी.
३. २०१७ मध्ये मनसे-शिवसेना युतीचा प्रस्ताव कसा होता?
२०१७ च्या पालिका निवडणुकीत मनसेने शिवसेनेला युतीचा प्रस्ताव दिला होता, ज्यामध्ये शिवसेना ‘मोठा भाऊ’ आणि मनसे ‘छोटा भाऊ’ अशी भूमिका होती. मात्र, शिवसेनेने हा प्रस्ताव नाकारला, कारण त्यावेळी ते बलस्थानात होते.
४. ठाकरे गटाच्या ‘संपलेला पक्ष’ विधानावर नांदगावकर काय म्हणाले?
शिवसेनेकडून मनसेबाबत ‘संपलेला पक्ष’ असे विधान झाले होते. यावर नांदगावकर म्हणाले की, निवडणूक काळात अशी विधाने होत असतात. मनसेही अशी वक्तव्ये करते, पण त्याचे वाईट वाटून घ्यायचे नसते.
५. सध्याच्या युतीबाबत मनसेची भूमिका काय आहे?
राज ठाकरे यांनी युतीबाबत स्पष्ट भूमिका टाळली आहे, तर उद्धव ठाकरे यांनी “एकत्र राहण्यासाठी एकत्र आलो” असे सकारात्मक वक्तव्य केले आहे. मनसे नेते अविनाश जाधव यांनी सावध भूमिका घेत “तोंड दुधाने पोळले आहे, ताक फुंकून पिऊ” असे म्हटले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.