
Maharashtra FYJC Admission 2025: अकरावी प्रवेश प्रक्रियेत तांत्रिक अडचणी आल्या होत्या. त्यानंतर तात्पुपरत्या ब्रेकनंतर अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया पुन्हा सुरु झालीय. कशी असेल ही प्रक्रिया? कशी करायची नोंदणी? याबद्दल सविस्तर जाणून घेऊया. 2025-26 शैक्षणिक वर्षासाठी महाराष्ट्र प्रथम वर्ष कनिष्ठ महाविद्यालय (FYJC) प्रवेश प्रक्रिया आज (26 मे 2025) सकाळी 11 वाजता सुरू झालीय. या पूर्वी आलेल्या त्रुटी राज्य शिक्षण विभागाने दूर केल्या आहेत. अकरावी प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अधिकृत ऑनलाइन पोर्टल mahafyjcadmissions.in – पुन्हा सुरू करणार आलंय. आता विद्यार्थ्यांना त्यांची नोंदणी सुरळीतपणे पूर्ण करता येणार आहे. FYJC प्रवेश अधिकृतपणे २१ मे रोजी सुरू झाले होते. पण काही तासांतच विद्यार्थी आणि पालकांना पोर्टलमध्ये प्रवेश करण्यात अडचणी आल्या. विशेषतः मोबाइल डिव्हाइसवर या अडचणी दिसून आल्या. नोंदणी दरम्यान अनेकांना त्रुटी जाणवल्या. यामुळे पालक त्रस्त झाले. यानंतर शिक्षण विभागाने देखभालीसाठी वेबसाइट ऑफलाइन केली.
महाविद्यालयांमध्ये निर्बंधांशिवाय अर्ज करण्याची परवानगी
आज पोर्टल पुन्हा उघडल्याने, विद्यार्थ्यांनी सुधारित अंतिम मुदतीपूर्वी त्यांचे अर्ज पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले होते. या वर्षी अकरावी प्रवेश प्रक्रियेत एक महत्त्वपूर्ण बदल झालाय. कारण राज्याने प्रथमच केंद्रीकृत ऑनलाइन प्रणाली सुरू केली. पूर्वी प्रवेश प्रदेश-विशिष्ट होते पण नवीन प्लॅटफॉर्म विद्यार्थ्यांना महाराष्ट्रातील महाविद्यालयांमध्ये निर्बंधांशिवाय अर्ज करण्याची परवानगी देण्यात आलीय.
अकरावी प्रवेश प्रक्रिया स्टेप बाय स्टेप
अकरावी प्रवेश प्रक्रिया स्टेप बाय स्टेप जाणून घेऊया. सर्वप्रथम अधिकृत वेबसाइट mahafyjcadmissions.in वर जा. “नवीन विद्यार्थी नोंदणी” वर क्लिक करा आणि वैयक्तिक आणि शैक्षणिक तपशील भरा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करा (इयत्ता १० ची गुणपत्रिका, ओळखपत्र पुरावा इ.). पसंतीची महाविद्यालये आणि स्ट्रीम (विज्ञान, वाणिज्य, कला इ.) निवडा. फॉर्म सबमिट करा आणि भविष्यातील संदर्भासाठी एक प्रत स्वत:कडे ठेवा.
पात्रता निकष
अकरावी प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्याने मान्यताप्राप्त मंडळातून दहावी (SSC किंवा त्या समकक्ष) परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी. केंद्रीकृत प्रणाली अर्जदारांना त्यांच्या स्थानिक जिल्ह्यांबाहेरील महाविद्यालये एक्सप्लोर करण्याची परवानगी देण्यात आलीय.
पुढे काय?
पोर्टल आता कार्यान्वित झाल्यामुळे विद्यार्थ्यांना 3 जूनच्या अंतिम मुदतीपूर्वी त्यांची नोंदणी पूर्ण करण्याचा सल्ला देण्यात आलाय. कोणत्याही तांत्रिक प्रश्नांसंदर्भात पालकांना मदत करण्यासाठी अतिरिक्त सहाय्यक पथके उपलब्ध असणार आहेत. नवीन अपडेटसाठी अर्जदार अधिकृत वेबसाइट तपासू शकतात. महाराष्ट्र शालेय शिक्षण विभागाच्या सोशल मीडिया चॅनेल फॉलो करुन ताजी माहिती मिळवू शकतात.
राज्यभरातील अकरावीच्या एकूण जागा किती?
एकूण प्रवेश क्षमत्ता: 20,91,390
कला शाखा: 6,72,654
वाणिज्य शाखा: 5,48,316
विज्ञान शाखा: 8,70,328
अकरावीच्या प्रवेशासाठी अर्ज कसा आणि कुठे भरायचा?
सगळ्यात आधी https://mahafyjcadmissions.in/landing या अधिकृत वेबसाइटवर जाऊन दोन टप्प्यात अर्ज भरायचा आहे.
पहिल्या भागात तुम्हाला तुमची सगळी वैयक्तिक माहिती भरायची आहे.
दुसऱ्या भागात तुम्हाला हवे असलेले कॉलेज भरायचे आहेत. तुमच्या पसंती नुसार क्रम लावायचा आहे. (तुम्ही जास्तीत जास्त १० पर्याय निवडू शकता)
अर्ज फी: अकरावी प्रवेशाची अर्जाची फी फक्त 100 रुपये आहे.
प्रत्येक प्रवेश फेरीत विद्यार्थी आपल्याला पसंतीक्रमानुसार प्रवेश मिळाला नसेल तर पुढील फेरीसाठी पसंतीक्रम पुन्हा भरावा लागेल.
अर्ज भरण्यात अडचण आल्यास…
अर्ज भरण्यात अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी 8530955564 या हेल्पलाईन नंबरवर संपर्क साधावा.
आता क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश बंद
पूर्वी काही खासगी कनिष्ठ कॉलेजमध्ये क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश देत शुल्क आकारले जात होते. परंतु यावर्षीपासून ही पद्धत थांबवण्यात आली असून सर्व प्रवेश ऑनलाइन आणि क्षमतेनुसारच होतील, असे माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांनी स्पष्ट केले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.