digital products downloads

Ganesh Chaturthi: गणेशोत्सवासाठी एसटीच्या 5,200 बस, कुठून आणि कधी सुटणार?

Ganesh Chaturthi: गणेशोत्सवासाठी एसटीच्या 5,200 बस, कुठून आणि कधी सुटणार?

Ganesh Chaturthi 2025: कोकणवासीयांच्या हृदयात विशेष स्थान असलेल्या गणेशोत्सवाला अवघा आठवडा बाकी असताना राज्य परिवहन महामंडळासह राजकीय पक्षांनीही चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासाची मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. मुंबई, ठाणे व पालघर विभागातून 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान 5200 जादा एसटी बसेस धावणार असून, यातील 4 हजार 987 बस 18 ऑगस्टपर्यंत फुल्ल बुक झाल्या आहेत.

चाकरमान्यांचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून एसटी महामंडळाने या जादा गाड्या उपलब्ध करून दिल्या आहेत. जवळपास 95 टक्के आरक्षण पूर्ण झाले असून महिला व ज्येष्ठ नागरिकांना सवलत मिळणार आहे. गर्दी टाळण्यासाठी महामुंबईत 40 तात्पुरते बसथांबे उभारण्यात आले आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार नव्या व चांगल्या स्थितीतील बस उपलब्ध करून देण्यात येतील असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी उपाय

गणेशोत्सव काळात बसस्थानके व बसथांबे याठिकाणी वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी कार्यरत राहणार आहेत. महामार्गांवर वाहन दुरुस्तीची पथके तैनात करण्यात आली असून प्रवाशांना कोणताही त्रास होऊ नये याची खबरदारी घेतली जात आहे.

मुंबई सेंट्रल, गिरगाव, महालक्ष्मी, दादर, जोगेश्वरी, कुर्ला-नेहरूनगर, अंधेरी, सांताक्रुझ, विलेपार्ले, वांद्रे, ठाणे-लोकमान्य नगर, भांडूप, मुलुंड, कल्याण-डोंबिवली, बदलापूर, अंबरनाथ, वसई, विरार, पनवेल, उरण आदी ठिकाणांहून या विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत.

राजकीय पक्षांकडून ‘मोफत बससेवा’

एसटीच्या या तयारीसोबतच आगामी निवडणुकांचा विचार करून विविध राजकीय पक्षांनीही कोकणवासीयांसाठी मोफत बससेवेची घोषणा केली आहे. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, वसई-विरार, मिरा-भाईंदर, कल्याण-डोंबिवली आदी भागांतून हजारो मोफत बसगाड्या कोकणात धावणार आहेत.

गेल्या महिनाभरापासून विविध पक्षांच्या जनसंपर्क कार्यालयांत आधारकार्ड व मतदार कार्डाच्या आधारे अर्ज भरून घेण्यास सुरुवात झाली आहे. काही ठिकाणी प्रत्यक्ष तर काही ठिकाणी व्हॉट्सअॅपद्वारे नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

राजकीय मोर्चेबांधणी

गणेशोत्सवानंतर मुंबई महानगर क्षेत्रातील महापालिका निवडणुका होण्याची शक्यता असल्याने कोकणातील मतदारांवर पकड मजबूत करण्यासाठी ही सेवा दिली जात आहे. शिवसेना, मनसे, भाजप यांसह इतर पक्ष या शर्यतीत आघाडीवर आहेत.

निवडणुकीच्या तोंडावर ज्याप्रमाणे ज्येष्ठ नागरिकांसाठी देवदर्शन, महिलांसाठी अष्टविनायक यात्रा किंवा पिकनिकच्या सहलींचे आयोजन केले जाते, त्याच धर्तीवर कोकणातील मतदारांना आकर्षित करण्यासाठी काही वर्षांपासून गणेशोत्सव मोफत बससेवा हा मार्ग अवलंबण्यात येत आहे.

FAQ

गणेशोत्सवासाठी कोकणात जाण्यासाठी किती जादा एसटी बसेस उपलब्ध आहेत?

मुंबई, ठाणे व पालघर विभागातून 22 ऑगस्ट ते 7 सप्टेंबरदरम्यान 5200 जादा एसटी बसेस धावणार आहेत.

या जादा बसेसच्या आरक्षणाची स्थिती काय आहे?

18 ऑगस्टपर्यंत 4,987 बस पूर्णपणे बुक झाल्या असून, जवळपास 95 टक्के आरक्षण पूर्ण झाले आहे.

 प्रवाशांसाठी कोणत्या सवलती उपलब्ध आहेत?

महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष सवलत मिळणार आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp