
Gold Rate Today: सुवर्ण नगरी जळगावात सोन्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे समोर आले आहे. सोन्याचे दर हे एक लाखांच्या खाली झाले आहेत. जळगावच्या सराफ बाजारात मागील काही दिवसांमध्ये सोन्याचे दर तब्बल चार हजार रुपयांनी घसरले आहेत. तसेच भविष्यात सोन्याचे दर अधिक घसरतील अशी शक्यता व्यक्ती केली जात आहे. नेमकं सुवर्ण व्यवसाय अभ्यासकांंचं काय म्हणणं आहे आणि काय ट्रेण्ड सोन्याच्या दरामध्ये दिसतोय ते पाहूयात…
आता सोन्याचा दर किती?
काही दिवसांपूर्वीच एक लाख दोन हजाराच्या आकडा पार केलेल्या सोन्याचे दर आता जीएसटी सह 98 हजार 700 रुपयांवर पोहोचले आहे. विक्रमी उच्चांकीवर पोहोचलेल्या चांदीच्या दरातसुद्धा गेल्या पाच दिवसात अडीच हजार रूपयांची घसरण झाली असून चांदीचे दर जीएसटीसह 1 लाख 14 हजार रुपयांवर आला आहे. महिन्याच्या अखेरीस सोन्याचे दर पुन्हा एक लाखाच्या आत आल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी झाल्याचे पाहायला मिळत आहे. मागील काही महिन्यांपासून सोन्याचे दर सातत्याने चढे राहिल्याचं दिसून आलं. सोन्याचे दराने नाही नाही म्हणता एक लाखांचा टप्पाही ओलांडल्याने आता सोनं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरच राहणार अशी चर्चा होती.
दर आणखी कोसळणार
इराण आणि इजराइल या दोन्ही देशांमधील युद्धामुळे जगभरामध्ये आर्थिक अस्थिरतेचं संकट निर्माण झालेलं. अमेरिकेसारखी महाशक्ती या युद्धात उतरल्याने या युद्धाच्या दिर्घकालीन परिणाम होईल अशी भीतीही व्यक्त केली जात होती. विशेष म्हणजे जगभरातील सोने बाजारावर या 12 दिवसांच्या युद्धाचा परिणाम पहायाला मिळाला. इस्रायल-इराण युद्धामुळे जळगावच्या सराफ बाजारामध्ये जून महिन्यात सोन्या चांदीच्या दरात मोठे चढ-उतार पाहायला मिळाले. जून महिन्याच्या सुरुवातीला सोन्याच्या दराने एक लाखांचा आकडा पार केला होता. मात्र आता जून महिना अखेर सोन्याचे दर पुन्हा एक लाखाच्या आत आले असून ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आगामी काळात इराण आणि इजराइल या दोन्ही देशांमधील युद्ध कायमचं थांबलं किंवा युद्धजन्य परिस्थिती संपली तर सोन्याचे दर आणखी 90 हजार रुपयांपर्यंत घसरतील असा अंदाज सुद्धा सराफ व्यावसायिक व्यक्त केला आहे. म्हणजेच जूनमधील सर्वोच्च दराचा विचार केला तर त्यापेक्षा हा पडलेला दर 12 हजार प्रती तोळ्याने कमी असेल.
दर एक लाखांखाली आल्याने ग्राहकांना दिलासा
दुसरीकडे महिनाभरापासून भाव कमी जास्त होत असल्याने खरेदी कधी करायची अशी द्विधा मनस्थिती असल्याचे महिला ग्राहकांनी सांगत तर एक लाखांचा आकडा पार केलेले सोन्याचे दर पुन्हा कमी झाल्यामुळे आता खरेदी बजेटमध्ये आल्याचं सुद्धा महिला ग्राहकांनी म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.