
GST Revision: देशात लागू झालेल्या जीएसटी कायद्यात एक मोठा बदल होऊ शकतो. सरकार सध्याच्या भरपाई उपकराच्या जागी दोन नवीन उपकर लागू करण्याची योजना आखतंय. एक आरोग्य उपकर आणि दुसरा स्वच्छ ऊर्जा उपकर. याचा थेट परिणाम सिगारेट, कोल्ड्रिंक्स, लक्झरी कार आणि कोळसा यासारख्या उत्पादनांवर होणार आहे. जर हा प्रस्ताव मंजूर झाला तर सामान्य माणसाच्या खिशावरचा भार निश्चितच वाढणार आहे.
कोणत्या गोष्टींवर आरोग्य उपकर?
तंबाखू उत्पादने, सिगारेट आणि साखरेचे पेये यासारख्या समाजासाठी हानिकारक मानल्या जाणाऱ्या वस्तूंवर आरोग्य उपकर लावला जाण्याची शक्यता आहे. या वस्तू आधीच जीएसटीच्या 28% टॅक्स लॅबमध्ये येतात. आता त्यांच्यावर अतिरिक्त आरोग्य उपकर लावण्याची योजना आखली जातेय. जेणेकरून लोकांना त्यांच्यापासून दूर राहण्यास प्रेरित करता येईल आणि सरकारला अतिरिक्त महसूल देखील मिळू शकेल.
स्वच्छ ऊर्जा उपकर कशावर?
स्वच्छ ऊर्जा उपकराचा उद्देश महागड्या वाहनांवर आणि कोळशासारख्या प्रदूषणकारी इंधनांवर कर वाढवून स्वच्छ ऊर्जेकडे वाटचाल करणे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हरित भारत धोरणाशी संबंधित हे एक पाऊल मानले जात आहे. यामुळे इलेक्ट्रिक आणि कमी प्रदूषणकारी तंत्रज्ञानांना प्रोत्साहन मिळेल अशी अपेक्षा आहे.
कर स्लॅबमध्येही मोठा बदल
केवळ उपकरच नव्हे तर सरकार 12% जीएसटी स्लॅब रद्द करण्याचा विचार करत आहे. यामुळे काही उत्पादने 5% च्या स्वस्त कर ब्रॅकेटमध्ये जातील, तर काही 18% च्या उच्च दरात समाविष्ट केली जातील. टूथपेस्टसारख्या दैनंदिन वस्तू स्वस्त कर ब्रॅकेटमध्ये ठेवता येतील. तथापि, यामुळे सुरुवातीला केंद्र सरकारवर 50 हजार कोटी रुपयांपर्यंतचा भार पडू शकतो. किंमती कमी झाल्या तर वापर आणि कर संकलन वाढेल, असे सरकारचा असा विश्वास आहे. एनडीटीव्हीने या संदर्भात वृत्त दिलंय.
जीएसटी संकलनामुळे सरकारच्या तिजोरीत वाढ
सरकारी आकडेवारीनुसार जून महिन्यात जीएसटी संकलनात 6.2% पेक्षा जास्त वाढ झालीय. ते 1.85 लाख कोटी रुपयांपर्यंत पोहोचलंय. तर गेल्या वर्षी याच कालावधीत हा आकडा सुमारे 1.74 लाख कोटी रुपये होता. असे असताना जूनमध्ये जीएसटी संकलन मे महिन्यात 2.01 लाख कोटी रुपये आणि एप्रिलमध्ये 2.37 लाख कोटी रुपये होते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.