
HSRP Number Plate: केंद्रीय परिवहन मंत्रालयाच्या निर्देशानंतर 1 एप्रिल 2019 पूर्वीच्या वाहनांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट (उच्च सुरक्षा क्रमांक पाटी) बंधनकारक करण्यात आली आहे. 30 एप्रिलपर्यंत वाहनधारकांना मुदत देण्यात आली आहे. मात्र आता एक वेगळाच प्रकार समोर येत आहे. नंबर प्लेट बसवण्यासाठी अनेक वाहनधारकांना मे महिन्याची तारीख देण्यात येत आहे. मात्र मुदत एप्रिल महिन्यात संपत असताना तारीख मेमध्ये देण्यात येत असल्याने नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
नंबर प्लेट लावण्याची मुदत 30 एप्रिल 2025 ही देण्यात आली आहे. मात्र अनेक वाहनधारकांना नंबर प्लेट लावण्यासाठी नोंदणी करताना मे महिन्यातील तारीख मिळत आहे. त्यामुळं वाहनधारकांकडून गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळं मुदत वाढवण्यात आली आहे का? असा सवाल वाहनधारक उपस्थित करत आहेत.
नंबर प्लेट बसवण्याची मुदत जवळ येत असल्याने वाहनधारक सेंटरवर गर्दी करत आहेत. दिवसाला सहा ते सात हजार बुकिंग होत आहेत. काही ठिकाणी नोंदणी झालेल्या वाहनांच्या नंबरप्लेट वेळेत आल्या नाहीत. तर काही सेंटर अचानक बंद झाले आहेत. नंबर प्लेट लावण्यासाठी दैनंदिन कोटा पूर्ण झाल्याने पुढील महिन्यातील तारीख मिळत आहे. वाहनधारकांनी गोंधळून जावू नये, असं अधिकाऱ्यांनी म्हटलं आहे.
नंबर प्लेट लावण्यासाठी दैनंदिन कोटा पूर्ण झाल्याने पुढील महिन्यातील तारीख मिळत आहे. वाहनधारकांनी गोंधळून जावू नये. वाहनधारकांना मे महिन्याची नोंदणीची तारीख मिळाली तरी घाबरून जायची गरज नाहीये. नोंदणीची तारीख पुढे जावू शकते. त्यामुळं नागरिकांनी गोंधळून जाण्याची गरज नाहीये.
बनावट संकेतस्थळांपासून लांब रहा
वाहनांसाठी हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट (एचएसआरपी) नोंदणीसाठी सहा बनावट लिंक तयार करून वाहन मालकांची फसवणूक सुरू असल्याचे समोर येताच खळबळ उडाली. बनावट लिंक तयार करून वाहन मालकांची फसवणूक करणाऱ्या अज्ञात सायबर भामट्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
३० एप्रिलची अंतिम मुदत
आदेशाची अंमलबजावणी व नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्र शासनाने १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी केलेल्या वाहनांना ३० एप्रिलपूर्वी एचएसआरपी बसविण्याचा निर्णय घेतला. यासाठी तीन संस्थांची नेमणूक केली आहे. प्लेट बसविण्याचे काम महाराष्ट्रात सुरू झाले आहे. एचएसआरपी बसविण्यासाठी वाहन मालकांना आरटीओच्या वेबसाइटवरील संबंधित टॅबमध्ये जाऊन नोंदणी करणे आवश्यक आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.