
महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झाली आहे. त्यांची असंघटित कामगार आयुक्त पदावरून दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
.
तुकाराम मुंढे यांच्यासह इतर चार अधिकाऱ्यांचीही बदली करण्यात आली आहे. त्यांच्या या बदलीमुळे पुन्हा एकदा प्रशासकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
कोणत्या अधिकाऱ्याची बदली कुठे?
- तुकाराम मुंढे (आयएएस: आरआर: 2005) विकास आयुक्त (असंघटित कामगार), मुंबई यांना सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- नितीन काशीनाथ पाटील (आयएएस: एससीएस: 2007) व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई यांना विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- अभय महाजन (आयएएस: नॉन-एससीएस: 2007) विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई यांना व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक विपणन महासंघ, मुंबई म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- ओंकार पवार (आयएएस: आरआर: 2022) सहाय्यक जिल्हाधिकारी, इगतपुरी उपविभाग, नाशिक यांना मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, नाशिक म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
- आशा अफजल खान पठाण – सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूर यांना महासंचालक, वनमती, नागपूर म्हणून नियुक्त करण्यात आले आहे आणि त्यांना सहसचिव, मुख्यमंत्री सचिवालय, नागपूरचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.