
Indian Railways: कोणतीही गाडी खरेदी करण्यापूर्वी त्याचा मायलेज तपासण्यात येतो. अशातच तुम्ही कधी विचार केलाय का की एक लिटर डिझेलमध्ये ट्रेन किती किलोमीटर चालते. लाखो लोकं दररोज ट्रेनने प्रवास करतात, पण कदाचित फार कमी लोकांना माहित असेल की भारतीय रेल्वे किती मायलेज देते. तेव्हा भारतीय रेल्वे किती मायलेज देते याविषयी माहिती जाणून घेऊयात.
देशात चालणाऱ्या प्रत्येक गाडीची स्पीड आणि मायलेज हे वेगवेगळं असतं. त्याच प्रकारे भारतीय ट्रेनचं मायलेज सुद्धा एक सारखं नसतं. ट्रेन इंजिनचे मायलेज त्याच्या पॉवरवर, त्यावर वाहून नेणाऱ्या भारावर, ती कोणत्या मार्गावर धावते आणि त्या मार्गावरील वाहतुकीवर अवलंबून असते. ट्रेनच्या मायलेजमध्ये सर्वात मोठा घटक म्हणजे ट्रेनचा वेग आणि ती प्लॅटफॉर्मवर किती वेळा थांबते.
वेगवेगळ्या ट्रेनचं वेगवेगळं मायलेज : भारतात अनेक प्रकारच्या रेल्वे गाड्या धावतात. तसेच प्रत्येक गाडीचा मार्ग आणि भार वेगवेगळा असतो.
पॅसेंजर ट्रेन : जर 12 कोचच्या प्रवासी ट्रेनमध्ये 1 लिटर डिझेल भरलं आणि ती सामान्य वेगाने धावली तर ती एका लिटरमध्ये 0.16 किलोमीटर म्हणजेच 160 मीटर धावेल. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, 12 डबे असलेली प्रवासी ट्रेन 6 लिटर इंधनात एक किलोमीटरचा प्रवास करु शकते.
एक्सप्रेस ट्रेन : 12 कोच असलेल्या एक्सप्रेस ट्रेनबद्दल बोलायचे झाल्यास 1 लिटर डिझेलमध्ये ही ट्रेन 0.2 किमी म्हणजेच 200 मीटर पर्यंत धावू शकेल. एक्सप्रेस ट्रेनचे इंजिन 4.5 लिटर इंधनामध्ये जवळपास एक किलोमीटर पर्यंत चालते.
सुपरफास्ट ट्रेन : सुपरफास्ट रेल्वे ट्रेन एक लिटर डिझेलमध्ये 230 मीटर प्रवास करतात. तर सामान्य प्रवासी गाड्या 1 लिटर डिझेलमध्ये 180 ते 200 मीटर अंतर पार करतात.
कमी स्टॉपेज, जास्त मायलेज : सुपरफास्ट गाड्यांचे थांबे कमी असतात, त्यामुळे त्यांचा वेग जास्त असतो. यामुळेच या गाड्या जास्त मायलेज देतात. वारंवार थांबल्याने आणि नंतर सुरू झाल्यामुळे इंजिनला जास्त इंधन खर्च करावं लागतं. थांबे जर कमी असतील तर इंधन कमी खर्च होतं.
FAQ :
एक्सप्रेस ट्रेनचे मायलेज किती आहे?
12 कोचच्या एक्सप्रेस ट्रेनचे मायलेज 1 लिटर डिझेलमध्ये 0.2 किलोमीटर (200 मीटर) आहे. म्हणजेच, अशी ट्रेन 4.5 लिटर डिझेलमध्ये 1 किलोमीटर प्रवास करते.
सुपरफास्ट ट्रेनचे मायलेज जास्त का आहे?
सुपरफास्ट ट्रेनचे थांबे कमी आणि वेग जास्त असतो, त्यामुळे इंधनाचा वापर कमी होतो आणि मायलेज जास्त मिळते.
सामान्य प्रवासी ट्रेनचे मायलेज किती आहे?
सामान्य प्रवासी ट्रेन 1 लिटर डिझेलमध्ये 180 ते 200 मीटर अंतर पार करते.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.