
Jalgoan News: खेळताना साडे तीन वर्षांच्या मुलाने मुकूट समजून ॲल्युमिनियमचे भांडे डोक्यात घातले. हा प्रकार काही क्षणात घडल्यामुळे पालकांसमोरही मोठा प्रश्न पडला. डॉक्टरांनी पुढे जे केलं त्यावर विश्वास बसणार नाही. पालकांसाठी हा सर्वात मोठा धडा आहे. पालकांनी यामधून अनेक गोष्टी शिकण्यासारखा आहे. जळगावमध्ये साडे तीन वर्षांच्या एका चिमुकल्याच्या डोक्यात ऍल्युमिनियमचे भांडे अडकल्याची घटना नुकतीच घडली आहे. खेळता-खेळता या मुलाने ऍल्युमिनियमचे एक भांडे (टोप) मुकुट समजून डोक्यात घातले. ते भांडे त्याच्या डोक्यात आणि मानेत इतके घट्ट अडकले की त्याला श्वास घेणे कठीण झाले होते.
सुरुवातीला अनेक रुग्णालयांनी जोखीम पाहून मुलाला दाखल करून घेण्यास नकार दिला होता. अखेर जळगावमधील सहारा मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे (Sahara Multi Speciality Hospital) डॉ. मिन्हाज पटेल यांनी हे आव्हान स्वीकारले.
डॉक्टरांनी एका प्लंबरच्या मदतीने आणि कटरचा वापर करून अत्यंत सावधगिरीने ते भांडे कापले. सुमारे 12 मिनिटांच्या प्रयत्नांनंतर मुलाचे डोके सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले. मुलावर यशस्वी उपचार करण्यात आले असून तो आता धोक्याबाहेर आहे. या यशस्वी बचाव कार्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी लहान मुले खेळत असताना त्यांच्याकडे सतत लक्ष ठेवणे आणि त्यांच्याजवळ धोकादायक वस्तू राहणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे आहे.
या घटनेचा व्हिडीओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
पालकांनी काय काळजी घ्यावी?
मुलांची घरात देखील विशेष काळजी घेणं महत्त्वाचं असतं. यामध्ये धोकादायक वस्तू, धारदार शस्त्रे, काचेच्या वस्तू, औषधे आणि रसायने (उदा. फिनाईल, डिटर्जंट) मुलांच्या हाताला लागणार नाहीत अशा उंचावर किंवा लॉक करून ठेवा. सर्व उघडे सॉकेट्स झाकून ठेवा आणि लूज वायर्स मुलांच्या आवाक्याबाहेर ठेवा. खिडक्या आणि गॅलरीला ग्रिल्स लावा. जिने किंवा धोकादायक भागाजवळ ‘बेबी गेट’ बसवा. जळगावमधील घटनेसारखे प्रकार टाळण्यासाठी, लहान मुलांच्या डोक्यात किंवा हातात अडकतील अशी अरुंद तोंडाची भांडी त्यांच्या खेळाच्या जागेपासून लांब ठेवा.
खाण्यापिण्याची काळजी
1-2 वर्षांच्या मुलांना चांगले शिजवलेले आणि मॅश केलेले अन्न द्या. त्यांना जेवण भरवताना घाई करू नका, कारण त्यामुळे गुदमरण्याचा (Choking) धोका असतो. अनोळखी व्यक्तीने दिलेले पदार्थ खाऊ नका, असे मुलांना शिकवा. विशेषतः उन्हाळ्यात मुलांना पुरेसे पाणी आणि पोषक द्रव पदार्थ द्या.
वैयक्तिक सुरक्षा नियम
मुलांना स्वतःचे नाव, पालकांचा फोन नंबर आणि घराचा पत्ता तोंडपाठ असावा. मुलांना ‘गुड टच’ आणि ‘बॅड टच’ यातील फरक सोप्या भाषेत समजावून सांगा. मुलांना घरात किंवा गाडीत कधीही एकटे सोडू नका.
भावनिक आणि मानसिक आरोग्य
मुलांशी दररोज त्यांच्या आवडीनिवडी आणि दिवसभराच्या गोष्टींवर चर्चा करा. यामुळे त्यांच्या मनात काय चालले आहे हे समजण्यास मदत होते. मुलांना शिस्त लावताना त्यांना ओरडण्यापेक्षा प्रेमाने समजावून सांगा, जेणेकरून त्यांचा आत्मविश्वास वाढेल.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



