
65 वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. 1960 मध्ये महाराष्ट्रासह गुजरात राज्य स्थापन करण्यात आला. 106 हुतात्म्यांनी संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला प्राणांची आहुती दिली. अशा पद्धतीने महाराष्ट्र हे राज्य स्थापन झालं. आज महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक जण अभिमान बाळगतो पण महाराष्ट्र हे नाव कसं देण्यात आलं.
कुठून आलं महाराष्ट्र हे नाव?
महाराष्ट्र राज्याची महाराष्ट्रीय प्राकृती भाषा होती. महाराष्ट्री अथवा महाराष्ट्री प्राकृत ही प्राचीन व मध्ययुगीन भारतातील एक प्राकृत भाषा होती. मराठी, कोकणी या आधुनिक भाषा महाराष्ट्रीपासून उद्भवल्या आहेत. ही भाषा उत्तरेतील माळवा प्रदेशापासून दक्षिणेतील कृष्णा, तुंगभद्रेपर्यंतच्या परिसरात बोलली जात असे. अनेक प्राचीन नाटकांतील पात्रांच्या तोंडी या भाषेचा वापर होत असे. सातवाहन सम्राट हाल याने गाहासत्तसई नामक काव्यसंग्रह महाराष्ट्रीत रचला.
(हे पण वाचा – शालिवानपासून चालत आलेल्या महाराष्ट्राचा भारावणारा प्रवास 8 मुद्यांमध्ये)
या भाषेवरुन महाराष्ट्र हे नाव राज्याला देण्यात आलं आहे. तसेच रट्टे नावाचे लोक महाराष्ट्रात होते. त्या रटट्यांचा प्रदेश म्हणजे ‘महाराष्ट्र’ असा देखील उल्लेख इतिहासात सापडतो.
महाराष्ट्र नावाचा अर्थ काय?
महाराष्ट्राला ‘महाराष्ट्र’ हे नाव कसे पडले, याबाबत अनेक मतं आहेत. काही जण म्हणतात की, महाराष्ट्रातील ‘महारठ्ठ’ किंवा ‘मराठा’ या क्षत्रिय वंशावरून हे नाव आले आहे. ‘महारठ्ठ’ म्हणजे ‘महाराज’ किंवा ‘महान राष्ट्र’ असा अर्थ होतो. काही इतिहासकार आणि भाषाशास्त्रज्ञ ‘राष्ट्र’ या शब्दाचा संबंध ‘महान’ किंवा ‘मोठा’ या अर्थाशी जोडतात, तर काही जण ‘महाकांतार’ या शब्दाचा अपभ्रंश म्हणून ‘महाराष्ट्र’ नावाची व्याख्या करतात.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.