
Maharashtra Government Survey 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारने आज 5 डिसेंबर 2025 रोजी वर्ष पूर्ण केलंय. त्यानिमित्ताने महायुती सरकारची गेल्या वर्षभराची कामगिरी कशी राहिली? कोणत्या योजना सामान्य लोकांच्या पसंतीला उतरल्या?.. सामान्य लोकांचं महायुती सरकारबाबत काय मत आहे?… हे जाणून घेण्याासाठी झी 24 तास आणि ज्युबिलंट डेटा स्टुडिओ (JDS) यांच्या सहकार्याने महाराष्ट्राचा राज्यव्यापी सर्व्हे केला. या सर्व्हेमध्ये महाराष्ट्रातील जनतेला 10 प्रश्न विचारण्यात आली.
हा महासर्व्हे 14 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर दरम्यान करण्यात आला. ज्यामध्ये एकूण 89 हजार 812 जणांनी सहभाग नोंदवला. या सर्वेक्षणात, सामाजिक-राजकीय संशोधन आणि डेटा विश्लेषणातील दोन पद्धतींचा उपयोग करण्यात आला.
पहिल्या टप्प्यात प्रत्यक्ष भेटी आणि घरघर फिरून सर्व्हे केला गेला. यामध्ये 4 महानगरं, 24 जिल्हे, 37 नगरपरिषदा आणि 48 तालुके समावेश होता. यादरम्यान 22 हजार 654 जणांच्या वैयक्तिक मुलाखती दिल्यात. तर दुसरा टेलिया मोबाईल-आधारित AI व्हॉइस सर्व्हे करण्यात आला. यात मोबाईलद्वारे अत्याधुनिक, संवादात्मक AI-आधारित व्हॉइस सर्व्हेमध्ये 67 हजार 158 जणांनी सहभाग नोंदवला.
यात जनतेला विचारण्यात आला एक प्रश्न होता की, पायाभूत सुविधांमधला कुठला प्रकल्प तुम्हाला प्रभावी वाटतो?
समृद्धी महामार्ग, अटल सेतू, मुंबई कोस्टल रोड आणि मेट्रो विस्तार असे चार पर्याय देण्यात आले. समृद्धी महामार्ग या प्रकल्पामुळे मुंबई नागपूर प्रवासाला 14 ते 16 तास लागायचे. तो प्रवास आता 8 – 9 तासांवर आला आहे. अटल सेतूमुळे मुंबईला सर्वात मोठा पूल मिळाला ज्यामुळे नवी मुंबईपासून पुणे, गोवा शहर जवळ आले आहेत. तर मुंबई कोस्टल रोडमुळे मुंबईकरांचा प्रवास सुकर झाला आहे. वाहतूक कोंडी कमी तर झालीच आहे इंधनाची बचत झाली आहे. तसंच नवी मुंबई आणि पश्चिम उपनगरांची कनेक्टिव्हिटी सुधारली आहे.

पण महाराष्ट्राच्या जनतेला या पायाभूत सुविधांमधला कोणता प्रभावी वाटला हे जाणून घेतलं आहे. त्यानुसार समृद्धी महामार्ग हा प्रकल्प बेस्ट ठरला आहे. या प्रकल्पाला जनतेला 38 टक्के पसंती दिली आहे. त्यानंतर अटल सेतूला 21 टक्के, मुंबई कोस्टल रोड या प्रकल्पाला 24 टक्के आणि मेट्रो विस्तारला 17 टक्के कौल दिला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



