
Maharashtra Weather News : केंद्रीय हवामान विभागाला ज्याची भीती होती, तशीच काहीशी स्थिती उद्भवताना दिसत आहे. आयएमडीच्या इशाऱ्यानुसार बंगालच्या उपसागरामध्ये हवामानाची नवी प्रणाली विकसित होत असून, येत्या काही दिवसांत चक्राकार वारे सक्रिय होणार असून ते अधिक मोठं संकट निर्णाण करू शकतात. मलेशिया आणि स्ट्रेट ऑफ मलक्का इथं तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं ही प्रणाली पश्चिम आणि उत्तर पश्चिमेस पुढे सरकेल आणि पुढील 24 तासांमध्ये अंदमान समुद्रावर कमी दाबाचा पट्टा तयार होणार असून, 48 तासांमध्ये त्याचं चक्रीवादळात रुपांतर होण्याचा धोका वाढत असल्याचा इशारा जारी करण्यात आला आहे.
महाराष्ट्रावरही या प्रणालीचा परिणाम होत असतानाच राज्यातील थंडीचं प्रमाण कमी होण्यासाठी उत्तरेकडील शीतलहरींचा जोर मंदावणं हे एक कारणंही पुढे येत आहे. उत्तरेकडील थंड हवेच्या झोताचा वेग कमी झाल्या कारणानं राज्यात थंडी कमी झाली असून, ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर, प्राथमिक स्वरुपात मध्य महाराष्ट्रासह कोकणातही मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर, राज्याच्या काही भागांमध्ये कमाल तापमानवाढीचा इशारा जारी करण्यात आला आहे.
राज्यतील तापमानात चढ- उतार
राज्यातील किमान तापमानाचा आकजा 7-8 अंशांवरून वाढून आता 12.8 अंशांवर पोहोचला आहे. तर, काही भागांमध्ये किमान तापमान 14 अंशांवर पोहोचलं आहे. ज्यामुळं राज्यातून थंडीनं दडी मारली असल्याचं स्पष्ट होत असून किनारपट्टी भागांमध्ये आर्द्रता वाढली आहे. राज्यात ठाणे, मुंबई, नवी मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीमध्ये ढगाळ वातावरणाचा अंदाज वर्तवण्यात आला असून पावसाच्या तुरळक सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
का उद्भवलीये पावसाची स्थिती?
कोमोरिन क्षेत्र आणि त्यानजीकच्या भागामध्ये चक्रीवादळसदृश्य परिस्थिती निर्माण होत असून, त्यामुळं दक्षिण पश्चिम बंगालच्या खाडीपासून श्रीलंका आणि नजीकच्या भागावर पूर्णत: कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची दाट शक्यता आहे. पुढं ही प्रणाली अधिक सक्रिय होणार असून, वरील स्थितीमुळं तामिळनाडू, केरळ, लक्षद्वीप, अंदमान निकोबार द्वीप समुह आणि किनारपट्टी भागामध्ये पुढील 5 दिवसांसाठी मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
IMD Weather Warning – Stay Alert!
A low-pressure system near Malaysia & the Strait of Malacca is likely to intensify into a depression over the South Andaman Sea within 24 hours. Expect heavy rain, strong winds & rough seas in the region.
Avoid sea travel, secure… pic.twitter.com/IFQ1Lqm6to
— India Meteorological Department (@Indiametdept) November 24, 2025
तामिळनाडूमध्ये 25 ते 27 नोव्हेंबरदरम्यान पाऊस हजेरी लावेस तर, केरळ, माहे इथं 26 नोव्हेंबरला मुसळधार पावसाचा इशारा आहे. ज्यामुळं नागरिकांना या दरम्यान सावधगिरी बाळगण्याचा आणि मासेमारांना खोल समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



