
Maharashtra Weather News : मागील 24 तासांमध्ये राज्याच्या काही भागांमध्ये पावसानं अंशत: हजेरी लावली. तर, काही भागांन मात्र उष्णतेचा मारा सहन करावा लागला. मुंबई शहर आणि उपनगरांमध्येसुद्धा आता पावसाचा माहोल सरला असून, इथं उकाडा वाढल्याचं पाहायला मिळालं. तर, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मात्र पावसानं हजेरी लावली. राज्यात सध्या पूर्वमोसमी पावसासाठी पोषक वातावरणनिर्मिती होत असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. तर, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागांना मात्र वादळी पावसाचा इशारा कायम ठेवला आहे.
पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहरासह उपनगरांमध्ये अंशतः ढगाळ वातावरण पाहायला मिळेल. मात्र पावसाचा हलका शिडकावा वगळता हे ढगाळ वातावरण चकवा देत उष्मा वाढल्यानं नागरिकांच्या अडचणी वाढतील असंही स्पष्ट करण्यात आलं आहे.
रविवारी सायंकाळपर्यं ढगाळ वातावरण आणि सूर्यकिरणांचा लपंडाव सुरूट असेल. तर, राज्यातील कमाल आणि किमान तापमानात चढ- उतार पाहायला मिळतील. हवामान विभागाच्या निरीक्षणानुसार अरबी समुद्रापासून उत्तर महाराष्ट्र आणि कोकणापर्यंत आणि मराठवाड्यापासून कर्नाटकत ते अगदी तामिनळनाडूपर्यंत कमी दाबचा पट्टा सक्रिय असल्या कारणानं राज्यात पावसासाठी पूरक वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे. हा पूर्वमोसमी पाऊस असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचंही हवामान विभागानं स्पष्ट केलं आहे.
मागील तासांतील तापमान अंश सेल्सिअसमध्ये (कमाल आणि किमान)
धुळे- 34.0- 19.6
कोल्हापूर- 34.1- 22.8
महाबळेश्वर- 24.5- 16.4
मालेगाव- 35.6- 21.5
सातारा- 32.2 – 21.1
पुणे – 32.8- 20.4
देशभरातील हवामानाचा आढावा
केंद्रीय हवामान विभागाच्या माहितीनुसार देशाच्या पूर्व, दक्षिण आणि पश्चिम भागामध्ये पावसाची शक्यता असून, 14 मे पर्यंत गुजरात, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात मेगघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. गुजरातच्या काही भागांमध्ये दरम्यानच्या काळात वादळी वारे वाहणार असून पश्चिम बंगालमध्ये मैदानी क्षेत्रांनाही पावसाचा तडाखा बसेल.
दक्षिण भारतातील बहुतांश राज्यांमध्ये मान्सूनपूर्व पावसाची सुरुवात होणार असून, इथं वाऱ्याचा वेग ताशी 50 ते 60 किमी इतका असेल. हवामान विभागाच्या माहितीनुसार आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, पुद्दुचेरीमध्ये 14 एप्रिलपर्यंत पावसाची शक्यता आहे. तर, 13 आणि 14 मे रोजी तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि कराईकलमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.