
Maharashtra Weather News : देशाच्या बहुतांश भागांतून नैऋत्य मान्सूननं माघार घेतेलली असताना देशाच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवर पूर्वोत्तर मान्सूनचा प्रभाव पाहायला मिळत आहे. तर, बंगालच्या उपसागरासर अरबी समुद्रात निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यासह चक्राकार वाऱ्यांनीसुद्धा हवामानावर परिणाम करत कैक बदल घडवून आणले आहेत. इथं महाराष्ट्रात तापमानात वाढ होत असून, मान्सूनची माघार उकाडा वाढवून गेली आहे.
राज्यातील सरासरी तापमानाचा आकडा वाढणार…
मुंबई, नवी मुंबई, विदर्भात बहुतांशी हवा कोरडी राहणार असून दुपारच्या वेळी उष्मा अधिक जाणावणार असल्याचा प्राथमिक अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. याव्यतिरिक्त समुद्रावरील वाऱ्यांच्या दिशेमध्ये होणाऱ्या सातत्यपूर्ण बदलांमुळं कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह तुरळक ठिकाणी पावसाच्या सरींचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असेल.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/jw7yrf8Es5 भेट घ्या. pic.twitter.com/vRU9xNR17q
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) October 17, 2025
पश्चिम महाराष्ट्र दिवाळीच्या तोंडावरच जलधारांनी चिंब भिजणार असून सातारा, सांगली, कोल्हापूर आणि घाट क्षेत्रातील काही भागांना पावसाचा इशारा देत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सध्या राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद ब्रह्मपुरी इथं करण्यात आली असून इथं पारा 36 अंशांवर पोहोचल्यानं उकाडा नेमका किती वाढला आहे याचाच अंदाज येत आहे. येत्या दिवसांत हा उका़डा आणखी तीव्र होणार असून ऑक्टोबरचा शेवटही उष्णतेच्या झळांनी होईल असं पूर्वानुमान आहे. थोडक्यात राज्यात पहाटेच्या वेळी गारठा वाढणार असून, दुपारच्या वेळी नागरिकांनी उन्हाचा तडाखा पाहून बाहेर पडावा असा इशारा देण्यात आला आहे.
हवामान बदलांमुळं आजारपण वाढणार…
सातत्यानं बदलणारं हवामान पाहता नागरिकांच्या आरोग्यावर याचा परिणाम होऊन सततचं सर्दी पडसं, ताप, उष्माघातामुळं ओढावणाऱ्या आरोग्याच्या समस्या पाहता यामुळं काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
FAQ
महाराष्ट्रात सध्या हवामानाची स्थिती काय आहे?
देशाच्या बहुतांश भागांतून नैऋत्य मान्सून माघार घेत असताना, दक्षिण किनारपट्टीवर पूर्वोत्तर मान्सूनचा प्रभाव दिसत आहे. बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्या व चक्राकार वाऱ्यांमुळे हवामानात बदल होत आहेत.
राज्यातील सरासरी तापमान कसे राहील?
राज्यातील सरासरी तापमान वाढणार असून, येत्या दिवसांत उकाडा आणखी तीव्र होईल. सध्या ब्रह्मपुरीत सर्वाधिक तापमान 36 अंश सेल्सिअस नोंदले गेले आहे. ऑक्टोबरचा शेवट उष्णतेच्या झळांनी होईल असा अंदाज आहे.
हवामान विभागाने कोणते अलर्ट जारी केले आहेत?
पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि घाट क्षेत्रासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे, ज्यामुळे तुरळक पावसाचा इशारा आहे. दुपारी उष्णतेमुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगावी.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.