
Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेकडे थंडीचा कडाका वाढला असून, या थंडीचा परिणाम मध्य भारतासह महाराष्ट्रातही दिसण्यास सुरुवात झाली आहे. प्रामुख्यानं मध्य महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागानं जारी केला असून, काही भागांमध्ये ढगाळ वातावरण कायम राहणार असल्याचा इशारा वर्तवण्यात आला आहे.
राज्यात येत्या 48 तासात तीव्र थंडीची लाट…
राज्यातील थंडीचा कडाका तीव्र होत असून पुन्हा एकदा किमान तापमानात मोठी घट होण्यास सुरुवात झाली आहे. याच कारणास्तव पुढील 48 तासांत ही लाट अधिक तीव्र होणार असून प्रामुख्याने पुणे अहिल्यानगर, नाशिक ,जळगाव, नंदुरबार, धुळे येथील किमान तापमान तीन ते चार अंशाने घसरेल असा अंदाज हवामान शास्त्रज्ञांनी वर्तवला आहे. इतकंच नव्हे तर काही भागात पारा सात ते आठ अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता असल्यानं राज्यात थंडीची लाट आणखी तीव्र होणार असल्याचं म्हटलं जात आहे.
मागील 24 तासांत उत्तर महाराष्ट्रात थंडीची कडाक्याची लाट आली असून , नाशिक जिल्ह्यात मंगळवारी किमान तापमान 10.3 अंशांवर होतं तर महाबळेश्वरमध्ये हा आकडा 12 अंशांवर होता. ज्यामुळं नाशिक महाबळेश्वरपेक्षाही थंड ठरत आहे.
पुन्हा जोर धरू लागलीये दातखिळी बसवणारी थंडी
सातारा जिल्ह्यात पुन्हा थंडी वाढली असून पारा 13 अंशांवर आला आहे.त्यामुळे मॉर्निंग वॉक आणि कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना उबदार कपड्यांचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यात गेल्या काही दिवसात थंडी कमी झाली होती मात्र तीन दिवसांपासून पुन्हा थंडी वाढू लागली आहे. वाई, पाचगणी भागातही पहाटेचं धुकं आणि थंडीचा कडाका कायम असल्यानं इथं पर्यटकांचे पाय वळू लागले आहेत.
Cold wave conditions very likely to prevail at isolated pockets in the districts of North Madhya Maharashtra.
तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपयाhttps://t.co/jw7yrf9chD भेट घ्या. pic.twitter.com/vRGyZX93DP— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) December 2, 2025
तिथं जळगाव जिल्ह्यातील अनेक भागात थंडीचा जोर वाढला असून जामनेर तालुक्यातील तोंडापूर परिसरात थंडी वाढली आहे. अजिंठा डोंगर रागांमध्ये थंडी दर दिवशी वाढत असून, त्यात धुके देखील पडायला लागल्याने अजिंठा डोंगराचं एक विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे. थोडक्यात राज्याच्या बहुतांश भागांमध्ये थंडीचा कडाका वाढत असून आता थंडीच्या तीव्रतेच्या आधारे हवामान विभागानं नागरिकांना सतर्क केल्याचं पाहायला मिळत आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



