
Maharashtra Weather News : महाराष्ट्र आणि भारतातून परतीच्या वाटेवर असणारा मान्सून मध्येच विश्रांती घेताना दिसत असून त्यात भर पडत आहे ती म्हणजे शक्ती या चक्रीवादळामुळं बदललेल्या वादळी वाऱ्यांच्या दिशेची. अरबी समुद्रात घोंघावत असलेल्या ‘शक्ती’ चक्री वादळाचा महाराष्ट्राला धोका नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं असलं तरीही राज्यात मात्र काही जिल्ह्यांमध्ये अंशत: ते मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार प्राथमिक अंदाजान्वये पुढच्या 48 तासांमध्ये मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यांसह कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भातील काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मराठवाडा उत्तर, पूर्व विदर्भ आणि उत्तर कोकणात पावसाचा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, हवामान विभागाच्या मुंबई शाखेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार कोकण, गोवा, दक्षिण मध्य महाराष्ट्रात ताशी 30 ते 40 किमी वेगानं वाहणाऱ्या वाऱ्यांसह मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात मध्यम स्वरुपातील पावसाची हजेरी असेल असा इशारा देण्यात आला आहे.
CS Shakhti over WC and adjoining NW AS moved W-SW lay centered at 1730 hrs IST of 6th October, 2025 over the same region about 180 km southeast of Masirah (Oman). Likely to recurve and move slowly E-SE over WC & adjoining WS AS and weaken into a D by the morning of 7th October. pic.twitter.com/wQ0806HEjz
— India Meteorological Department (@Indiametdept) October 6, 2025
शक्ती चक्रीवादळाचा परिणाम कुठवर?
ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिलेल्या माहितीनुसार 6 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 5 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास पश्चिममध्य आणि लगतच्या वायव्य अरबी समुद्रावर चक्रीवादळ शक्तीचे वारे धडकले.; मसिरा(ओमान)पासून सुमारे 180km आग्नेयेस,कराची(पाकिस्तान) 930km नैऋत्येस, द्वारकेपासून 970 km पश्चिम- नैऋत्येस या वादळाचा झंझावात पाहायला मिळाला. हे वादळ पुन्हा वळण्याची शक्यता असून, 7 Oct ला सकाळच्या सुमारास कमी दाबाच्या पट्ट्यात ते रूपांतरित होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
FAQ
शक्ती चक्रीवादळ काय आहे आणि त्याची सद्यस्थिती काय?
शक्ती हे अरबी समुद्रात घोंघावणारे तीव्र चक्रीवादळ आहे, जे 6 ऑक्टोबर 2025 रोजी सायंकाळी पश्चिममध्य आणि वायव्य भागात धडकले. मसिरा (ओमान) पासून 180 किमी आग्नेयेस, कराची (पाकिस्तान) 930 किमी नैऋत्येस आणि द्वारका (गुजरात) पासून 970 किमी पश्चिम-नैऋत्येस स्थित आहे.
महाराष्ट्रावर शक्ती चक्रीवादळाचा धोका आहे का?
हवामान विभागानुसार, महाराष्ट्राच्या किनारपट्टीला थेट धोका नाही. मात्र, वादळामुळे बदललेल्या वाऱ्यांमुळे राज्यातील काही भागांत पाऊस आणि वारे वाढतील.
महाराष्ट्रात कोणत्या भागांत पावसाचा अलर्ट आहे?
यलो अलर्ट (मध्यम पाऊस): मराठवाडा, उत्तर-पूर्व विदर्भ आणि उत्तर कोकण.
मुसळधार पावसाची शक्यता: मुंबई, ठाणे, पालघर, कोकण किनारपट्टी आणि पूर्व विदर्भातील काही भाग.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.