
Malegaon Blast Case: 2008 मध्ये मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात अनेक व्यक्तींवर गंभीर आरोप लावण्यात आले आहेत. यामध्ये राजकीयदृष्ट्या संवेदनशील नावांचाही समावेश असून आरोपींविरोधात सध्या न्यायालयीन प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात कोण-कोणते आरोपी आहेत आणि त्यांची नावे कशामुळे जोडली गेली आहेत. यासंबंधित संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत.
1. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्यावर आरोप आहे की त्या मालेगावमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाच्या कटामधील बैठकींमध्ये सहभागी होत्या. या स्फोटासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल त्यांच्या नावावर होती. त्यांच्यावर या कटात सक्रिय सहभाग, वाहन उपलब्ध करून दिल्याचा आरोप आहे. तर वकिलांच्या मते, मोटारसायकल आधीच विकली होती. चेसिस नंबर नोंदणीकृत नव्हता. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर त्या कटामध्ये सहभागी नव्हत्या.
2. लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद श्रीकांत पुरोहित यांच्यावर मालेगाव प्रकरणी असे आरोप आहेत की, ‘अभिनव भारत’ या संघटनेच्या माध्यमातून हिंदू राष्ट्र स्थापनेचा अजेंडा. यामध्ये ते कटाचा प्रमुख सूत्रधार, स्फोटके आणि बैठकींची व्यवस्था केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. तर त्यांच्या वकिलांनी काँग्रेस सरकारने बनवलेली ‘हिंदू आतंकवाद’ नाव जोडल्याचा दावा केलाय.
3. सेवानिवृत्त मेजर रमेश उपाध्याय यांच्यावर असे आरोप आहेत की त्यांनी, त्यांचे नाव ‘अभिनव भारत’ शी जोडले असून त्यांचा स्फोटाच्या कटामध्ये सहभाग होता.
4. अजय राहिरकर यांच्यावर मालेगावमधील स्फोटासाठी आर्थिक मदतीची व्यवस्था केल्याचा आरोप करण्यात आला आहे.
5. सुधाकर द्विवेदी (उर्फ शंकराचार्य/दयानंद पांडे) यांच्यावर मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी धार्मिक विचारसरणीच्या माध्यमातून मानसिक प्रेरणाचे समर्थन आणि मानसिक उकसावा देण्याचा आरोप आहे.
6. सुधाकर चतुर्वेदी यांच्यावर देखील मालेगाव बॉम्बस्फोटाच्या कटाच्या बैठकीत सहभाग असल्याचा आरोप आहे.
7. समीर शरद कुलकर्णी यांच्यावर स्फोटक तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनांची व्यवस्था केल्याचा आरोप आहे.
बचाव पक्षाचा दावा
आरोपी समीर कुलकर्णीची माहिती- आम्ही निर्दोष आहोत. एटीएसने आमच्या घरात आरडीएक्स ठेवून आम्हाला फसवलं. काँग्रेस सरकारने ‘हिंदू आतंकवाद’चा बनाव तयार करून आमच्यावर अन्याय केला आरोपी समीर कुलकर्णीने म्हटलं आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.