
Malegaon Blast Case Verdict Updates: मालेगाव बॉम्ब स्फोट प्रकरणी एनआयएने सर्व सात आरोपींची निर्दोष सुटका केली आहे. तब्बल 17 वर्षानंतर कोर्टाने हा निकाल दिला आहे. मालेगावच्या भिक्कू चौकात 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता. या स्फोटात 6 जणांचा मृत्यू झाला होता तर 100 पेक्षा अधिक लोक जखमी झाले होते. आज कोर्टात निकाल देताना न्यायाधीक्षांनी नेमकं काय म्हणणं मांडलं, हे सविस्तर जाणून घेऊयात.
साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर यांच्या बाईकबाबत न्यायालयाने काय म्हटलं?
बॉम्बस्फोट झाला हे कोर्टाने मान्य केले मात्र बाईकवरच बॉम्बस्फोट झाला की नाही हे सिद्ध होऊ शकले नाही. तसंच, ती बाईक कोणाची होती, हेदेखील सिद्ध होऊ शकले नाही. साध्वी प्रज्ञा सिंग यांच्या नावाने असलेल्या चेसिस नंबर नीट आढळला नव्हता. नंबरप्लेट व्यतिरिक्त चेसिस नंबर आवश्यक असतो. साध्वीच्या नावाने असलेल्या बाईकचा चेसिस नंबर नीट नव्हता, त्यामुळं ती बाईक साध्वीचीच होती, हे सिद्ध करणारे ठोस पुरावे सरकारी पक्षाला सादर करता आले नाही, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.
कोर्टाने नेमकं काय म्हटलं?
– प्रसाद पुरोहित यांनी RDX काश्मीरमधून आणले याचा कोणताही पुरावा नाही. जे काही फॉरेन्सिक पुरावे मिळाले त्याबाबत छेडछा़ड केले गेले होते. जे कोर्ट पुरावे म्हणून ग्राह्य धरु शकत नाही.
– ‘अभिनव भारत’ या संस्थेत काही रक्कम आली असली तरी आरोपीने त्या रकमेचा वापर स्फोटसाठी करण्यात आल्याचे सिद्ध होऊ शकले नाही.
– फॉरेन्सिक विभागाने पंचनामा केल्यानंतर घटनास्थळी जिथे बॉम्बस्फोट झाला. तो ज्या क्षमतेचा होता त्याचे क्रेटर तिथे मिळाले नाही. तसंच, बॉम्ब कुठे जोडण्यात आले हेदेखील सिद्ध होऊ शकले नाही.
– कोर्टाने सांगितले की, संशय या सगळ्यावर येत असला तरी संशय हा ठोस पुरावा होऊ शकत नाही. त्यामुळं आरोपींची मुक्तता करण्यात आली आहे.
वकिलांनी काय म्हटलं?
जे सुरुवातीपासून या केसला रंग देण्यात आला. फक्त गाडी वापरली म्हणून साध्वीचं नाव वापरलं गेलं, पण ती गाडी वापरली गेली म्हणून साध्वीची होती हे सिद्ध होऊ शकलं नाही. कोर्टाने म्हटलं आहे की, गाडीचा मालक सिध्ध करण्यासाठी गाडीचा नंबर आणि चेसिस नंबर दोन्ही सि्द्ध करावे. पण ते सि्द्ध होऊ शकले नाही.
FAQ
Q: कधी झाला होता मालेगाव बॉम्बस्फोट?
ANS: 29 सप्टेंबर 2008 रोजी बॉम्बस्फोट झाला होता
Q: स्फोटात किती जणांचा झाला होता मृ्त्यू?
ANS: मालेगाव बॉम्बस्फोटात 6 जणांचा मृत्यू
Q:प्रज्ञा सिंह यांच्यावर कोणते आरोप?
स्फोटासाठी वापरण्यात आलेली मोटारसायकल त्यांच्या नावावर. वाहन उपलब्ध करून दिल्याचा आरोप
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.