
Metro Strict Rules: मुंबई मेट्रो लाइन ३ (एक्वा लाइन) चा पहिला टप्पा बीकेसी ते आरे (12.69 किमी) ऑक्टोबर 2025 मध्ये सुरू झाला. हा मुंबईचा पहिला पूर्ण अंडरग्राउंड कॉरिडॉर असून 10 स्टेशन्स जोडतो. दररोज 5 लाख प्रवाशांचा प्रवास सुखकर होत आहे. यामुळे ट्रॅफिक कमी होण्यासही मदत होतेय. मेट्रोचे नियम ऐव्हाना सर्वांना माहिती झाले असतील. दरम्यान दुबई मेट्रोचा एक नियम चर्चेचा विषय बनलाय. काय आहे हा नियम? सविस्तर जाणून घेऊया.
दुबई मेट्रोने प्रवाशांसाठी कडक मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. मेट्रोच्या डब्यात जमिनीवर बसणे, सीटवर झोपणे किंवा प्रवासी नसलेल्या क्षेत्रात प्रवेश करणे यासारख्या कृतींवर कठोर दंड आकारला जाणार आहे. अलीकडे यासंदर्भातील एक पोस्ट सोशल मीडियात व्हायरल होतेय. दुबईच्या रोड्स अँड ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (आरटीए) ने प्रवाशांना सभ्य वर्तन राखण्याचे आवाहन केलंय.
दंडाची रक्कम किती?
दुबई मेट्रोच्या नियमांचे उल्लंघन केल्यास किमान 100 दिरहम म्हणजेच सुमारे 2250 रुपये दंड आकारला जाऊ शकतो. आणि काही प्रकरणांमध्ये हा दंड 1 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो. जमिनीवर बसणे, मेट्रोच्या गेटसमोर अडथळा निर्माण करणे, सीटवर पाय ठेवणे किंवा गैर-प्रवासी क्षेत्रात प्रवेश करणे यासारख्या कृतींमुळे प्रवाशांच्या सुरक्षेला धोका निर्माण होतो आणि इतरांचा आराम बाधित होतो, असं मेट्रो प्रशासनानं म्हटलंय
काय आहेत मार्गदर्शक तत्त्वे?
मेट्रोमध्ये प्रवेश करताना प्रथम इतरांना बाहेर पडू देणे, वैयक्तिक जागेचा आदर करणे आणि प्रवासी नसलेल्या क्षेत्रात बसणे टाळणे आवश्यक आहे. मेट्रोच्या डब्यात आडवे होणे, झोपणे किंवा अनुचित वर्तन करणे यामुळे दंड होऊ शकतो. आरटीएने प्रवाशांना जबाबदार आणि सभ्य वर्तन राखण्याचे आवाहन केले आहे.
नियमित तपासणी
मेट्रोमध्ये नियमित तपासणी केली जाते. निरीक्षक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करतात. व्हायरल पोस्टमुळे या नियमांना अधिक प्रसिद्धी मिळाली असून, प्रवाशांनी सावध राहण्याचा सल्ला देण्यात आल्याची माहिती आरटीएच्या अधिकाऱ्यांनी दिली.
सुखकर,सुरक्षित प्रवासाचे उद्दिष्ट
Thank you for contacting us, and apologies for any inconvenience. Kindly note that the inspectors are constantly checking Dubai Metro, noting that fines are issued to non-committed passengers. Also, kindly note that you can report such incidents to the metro station staff and…
— RTA (@rta_dubai) October 13, 2025
दुबई मेट्रोने प्रवाशांना सुखकर आणि सुरक्षित प्रवासाचा अनुभव देण्यासाठी हे नियम लागू केले आहेत. सर्व प्रवाशांनी नियमांचे पालन करून मेट्रोच्या सुविधांचा योग्य वापर करावा, असे आवाहन आरटीएने केले आहे. यामुळे प्रवासाचा अनुभव अधिक चांगला होईल आणि दंड टाळता येईल, असं मेट्रो प्रशासन म्हटलंय.
FAQ
प्रश्न: दुबई मेट्रोमध्ये कोणत्या कृतींवर दंड आकारला जाऊ शकतो?
उत्तर: दुबई मेट्रोमध्ये जमिनीवर बसणे, सीटवर झोपणे, मेट्रोच्या गेटसमोर अडथळा निर्माण करणे, प्रवासी नसलेल्या क्षेत्रात प्रवेश करणे किंवा पाय वर ठेवून बसणे यासारख्या कृतींवर दंड आकारला जाऊ शकतो. या नियमांचे उल्लंघन केल्यास किमान १०० दिरहम (सुमारे २,२५० रुपये) पासून दंड सुरू होतो आणि तो १ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकतो.
प्रश्न: दुबई मेट्रोच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन का महत्त्वाचे आहे?
उत्तर: दुबई मेट्रोच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केल्याने सर्व प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव मिळतो. जमिनीवर बसणे किंवा गैर-प्रवासी क्षेत्रात प्रवेश यासारख्या कृतींमुळे सुरक्षेला धोका निर्माण होतो आणि इतर प्रवाशांचा आराम बाधित होतो. नियमांचे पालन न केल्यास दंड होऊ शकतो, त्यामुळे सभ्य वर्तन राखणे आवश्यक आहे.
प्रश्न: दुबई मेट्रो नियमांचे पालन सुनिश्चित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातात?
उत्तर: दुबईच्या रोड्स अँड ट्रान्सपोर्ट अथॉरिटी (आरटीए) चे निरीक्षक नियमितपणे मेट्रोची तपासणी करतात आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई करतात. प्रवाशांना सभ्य वर्तन राखण्याचे आवाहन करण्यात आले आहे, जसे की इतरांना प्रथम बाहेर पडू देणे आणि वैयक्तिक जागेचा आदर करणे. व्हायरल पोस्टनंतर आरटीएने या नियमांना अधिक प्रसिद्धी देत प्रवाशांना सावध राहण्यास सांगितले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.