digital products downloads

MIDC उद्योगांना PNG कनेक्शन अनिवार्य: 30 जूननंतर सिलिंडर पुरवठा पूर्णपणे बंद होणार – Nagpur News

MIDC उद्योगांना PNG कनेक्शन अनिवार्य:  30 जूननंतर सिलिंडर पुरवठा पूर्णपणे बंद होणार – Nagpur News



एमआयडीसी क्षेत्रातील उद्योगांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे. ३० जून २०२६ पूर्वी सर्व औद्योगिक युनिट्सनी पाइपद्वारे नैसर्गिक वायू (PNG) कनेक्शन घेणे अनिवार्य करण्यात आले आहे. या मुदतीनंतर गॅस सिलिंडरचा पुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. एमआयए (MIA) चे अध्यक्ष पी. मोहन यांनी उद्योगांना या निर्णयाची गांभीर्याने दखल घेण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, “ही अंतिम मुदत गंभीरपणे घ्या. वेळेत PNG कनेक्शन न घेतल्यास उत्पादन प्रक्रियेवर थेट परिणाम होऊ शकतो.” महाराष्ट्र शासनाच्या सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन धोरणाच्या अंमलबजावणीच्या पार्श्वभूमीवर एमआयडीसी इंडस्ट्रीज असोसिएशनने ही अधिसूचना जारी केली आहे. औद्योगिक वापरासाठी एलपीजीच्या वाढत्या टंचाईमुळे उद्योगांना मोठा फटका बसत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या संदर्भात स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार, ज्या भागांमध्ये PNG सुविधा उपलब्ध आहे, तेथील सर्व उद्योगांनी ३० जूनपूर्वी कनेक्शनसाठी अर्ज करणे बंधनकारक राहील. ३० जूननंतर औद्योगिक वापरासाठी एलपीजी पुरवठा पूर्णपणे बंद होईल. या निर्णयाचा परिणाम केवळ उद्योगांवरच नाही, तर कामगारांच्या घरगुती वापरासाठीचे सिलिंडरही बंद होणार आहेत. एमआयडीसी निवासी वसाहतींनाही PNG कडे वळणे अनिवार्य करण्यात आले आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp