
NCP MLA Prakash Solanke Remark : सोमवारी परळीत नगरपरिषद निवडणुकीच्या प्रचारसभेत माजीमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी नाव न घेता वाल्मिक कराडची आठवण काढली. ही आठवण जाहीरपणे असल्यामुळे धनंजय मुंडेंचा रोख कुणाकडे आहे ते सगळ्यांना कळलं. या प्रकरणावर धनंजय मुंडे यांना घरचा आहेर मिळाला आहे.
आमदार प्रकाश सोळंकी यांनी धनंजय मुंडे यांना त्यांच्या या विधानावरुन घरचा आहेर दिला आहे. फारच खंत झाली तर त्याच्या शेजारी जाऊन बसा तुम्हा आणि खंत दूर करा, असं म्हणत प्रकाश सोळंकी यांनी घरचा आहेर लगावला आहे.
काय म्हणाले प्रकाश सोळंकी
आमदार धनंजय मुंडे यांनी परळी येथील जाहीर सभेत बोलताना एक व्यक्ती या ठिकाणी नसल्याची जाणीव होत असल्याचे वक्तव्य केले होते त्यावर आता माजलगावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश सोळंके यांनी त्यांना टोला लगावला आहे. आमदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्यासोबत सावलीसारख्या राहणाऱ्या वाल्मीक कराडबाबत हे वक्तव्य केलं असावं तो नसण्याची एवढी खंत वाटत आहे तर त्याच्यासोबत जाऊन बसा आणि खंत दूर करा असे आमदार प्रकाश सोळंके यांनी म्हटले आहे. वाल्मीक कराड हा संतोष देशमुख हत्या प्रकरणात सध्या बीडच्या कारागृहात आहे त्याबाबतच्या या वक्तव्यावरून आता बीडच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
(हे पण वाचा – ‘आपली व्यक्ती आज इथे नाही…’, म्हणत धनंजय मुंडेंकडून वाल्मिक कराडचा उल्लेख)
अंबादास दानवे काय म्हणाले?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्ये प्रकरणात वाल्मीक कराड जेल मध्ये आहे. याचा अर्थ धनंजय मुंडेने प्रूफ केलं वाल्मीकराड धनंजय मुंडे एकच आहे. धनंजय मुंडे यांच्या सपोर्टमुळे वाल्मीक कराड यांची गुन्हेगारी प्रवृत्ती फोफावली होती. वारंवार त्या भागातल्या जनतेने याबाबत तक्रार केली होती. देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या पाठिंबांमुळे सर्व गोष्टी घडल्या आहे. निवडणूक आयोगाने यावर स्पष्ट भूमिका घेणे गरजेचे आहे, असं देखील अंबादास दानवे यावेळी म्हणाले.
काय म्हणाले होते धनंजय मुंडे?
परळीतील नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या प्रचारार्थ आज परळी मध्ये पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीमध्ये संयुक्त मेळाव्याचे आयोजन केले होते यावेळी आमदार धनंजय मुंडे यांनी बोलत असताना भाषणाच्या शेवटी म्हटले की आज परळीतील जगमित्र कार्यालय गेल्या नऊ ते सहा महिन्यापासून आजही सर्वसामान्य जनतेसाठी खुल आहे मात्र आज या मंचावर मला एका व्यक्ती नसल्याची जाणीव भासत आहे ती व्यक्ती आज आपल्यात नाही जे काहीअसेल नसेल ते न्यायालय पाहील काय व्हायचे ते होईल मात्र त्या व्यक्तीची आज जाणीव भासत आहे असं धनंजय मुंडे यांनी नाव न घेता आरोपी वाल्मिक कराडची आठवण काढली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



