
MPSC Civil Services Preliminary Exam 2025: महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 या परीक्षेचे परिपत्रक आयोगाकडून जाहीर करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात 385 पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ही 28 सप्टेंबर 2025 रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 37 जिल्हा केंद्रावर ही परीक्षा होणार आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षेसाठी 28 मार्च 2025 पासून अर्ज करण्यास सुरुवात होणार आहे. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल 2025 पर्यंत असणार आहे. ऑनलाइन पद्धतीने परीक्षेचे शुल्क भरण्याची अंतिम तारीख 17 एप्रिल 2025 असणार आहे. तर, भारतीय स्टेट बँकेत चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्यासाठी चलनाची प्रत घेण्याची तारिख 19 एप्रिल 2025 असणार आहे. तसंच, चलनाद्वारे परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम तारीख 21 एप्रिल 2025 असणार आहे.
किती रिक्त जागा
एकूण रिक्त जागांमध्ये सामान्य प्रशासन विभाग (राज्य सेवा) – १२७, महसूल व वन विभाग (महाराष्ट्र वनसेवा)- १४४, सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा) – ११४ अशी विभागणी करण्यात आलेली आहे.
एकूण रिक्त जागाः 385
अर्जप्रक्रिया कधी सुरू होणारः 28 मार्च 2025
कधीपर्यंत अर्ज करता येणारः 18 एप्रिल 2025
वेबसाइटः https://mpsconline.gov.in/candidate/login
नोटिफिकेशन लिंकः https://mpsc.gov.in/adv_notification/8
मागील दोन महिन्यांपासून विद्यार्थी सातत्याने परीक्षेची वाट पाहत होते. मात्र परीक्षेच्या तारखा जाहीर होत नव्हत्या. काही महिन्यांपासून एमपीएससीच्या अनेक परीक्षांचे निकाल मुलाखती रखडल्याने उमेदवार सवाल उपस्थित होत होता. अखेर परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. आयोगाने ३८५ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यामुळे राज्यातील लाखो उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.