
Mumbai Crime News: दक्षिण मुंबईतील एक घटना समोर आली आहे. केवळ 20 वर्षांच्या मतिमंद तरुणीवर अनेकांनी अमानुषपणे अत्याचार केल्याचं उघड झालं असून, तिची अवस्था समजताच या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह 37 वर्षीय आरोपीला अटक केली आहे तर परिसरातील 15 हून अधिक जणांचे डीएनए नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत.
काही दिवसांपूर्वी मतिमंद तरुणीने घरच्यांना पोटात किडा वळवळत असल्याची तक्रार केली. सुरुवातीला घरच्यांनी तो किरकोळ आजार समजला. मात्र तिची प्रकृती खालावल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तपासणीत ती पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं समोर आलं आणि त्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली.
मतिमंद तरुणीची चौकशी
महिला पोलिसांनी पीडित तरुणीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. परंतु मतिमंद अवस्थेमुळे तिच्याकडून योग्य माहिती घेणं कठीण ठरलं. अखेर पोलिसांनी बालहक्कांसाठी कार्यरत असलेल्या एका सेवाभावी संस्थेची मदत घेतली. संस्थेच्या स्वयंसेविकांनी त्या तरुणीशी संवाद साधण्यासाठी एकूण पाच सत्रं घेतली. हळूहळू तिचा विश्वास संपादन करून त्यांनी तिच्याकडून माहिती मिळवली. या संवादातून समोर आलं की, अनेकांनी त्या तरुणीवर अत्याचार केले असून तिला धमकावण्यातही आलं होतं. त्यामुळे ती घाबरलेल्या अवस्थेत होती.
तरुणीने ज्या दोन व्यक्तींची नावे स्पष्टपणे सांगितली त्यांना पोलिसांनी तत्काळ अटक केली. उर्वरित संशयितांची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी परिसरातील 15 पेक्षा अधिक जणांचे डीएनए नमुने गोळा केले आहेत. हे सर्व नमुने तपासणीसाठी कलिना येथील फॉरेन्सिक सायन्स लॅबोरेटरीकडे पाठवण्यात आले आहेत. डीएनए जुळणीचा अहवाल आल्यानंतर संबंधित आरोपींवर पुढील कारवाई केली जाणार आहे.
पोलिसांकडून कठोर कारवाई
या प्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला अज्ञातांविरोधात भारतीय दंड संहिता कलम 376(2)(i) आणि 376(2)(k) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आतापर्यंत दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित संशयितांचा शोध सुरू आहे. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, हा अत्याचार दीर्घकाळ चालत असल्याची शक्यता नाकारता येत नाही.
दक्षिण मुंबईसारख्या शहरात मतिमंद तरुणीवर असा क्रूर प्रकार घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. समाजातील अशा असंवेदनशील घटनांकडे लक्ष देऊन पोलिस आणि सामाजिक संस्थांनी पुढे येणं अत्यावश्यक असल्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांनी केली आहे.
FAQ
घटना कधी आणि कुठे घडली?
दक्षिण मुंबईतील लक्ष्मीनगर भागात एका २० वर्षांच्या मतिमंद तरुणीवर अनेकांनी अत्याचार केल्याची घटना घडली. ही घटना दीर्घकाळ चालत असल्याची शक्यता आहे.
पीडितेची तक्रार कशी सुरू झाली?
काही दिवसांपूर्वी पीडितेने पोटात किडा वळवळत असल्याची तक्रार केली. प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल झाल्यावर ती ५ महिन्यांची गर्भवती असल्याचे समोर आले.
पोलिसांनी तक्रार कशी घेतली?
मतिमंद अवस्थेमुळे पीडितेने स्पष्ट माहिती दिली नाही. पोलिसांनी बालहक्कांसाठी कार्यरत संस्थेच्या मदतीने ५ सत्रे घेऊन तिचा विश्वास संपादन करून माहिती मिळवली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.