digital products downloads

Mumbai-Goa Highway Traffic : 5 आणि 6 जूनला मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, कसा असणार पर्यायी मार्ग?

Mumbai-Goa Highway Traffic : 5 आणि 6 जूनला मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी, कसा असणार पर्यायी मार्ग?

Mumbai Goa Highway Traffic : किल्ले रायगडावर 6 जून रोजी साजऱ्या होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची गैरसोय होऊ नये तसेच वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी रायगड जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यात जड आणि अवजड वाहनांच्या वाहतुकीला बंदी घातली आहे. 5 जून रोजी संध्याकाळी 4 वाजल्यापासून ते 6 जून रोजी रात्री 10 वाजेपर्यंत ही बंदी लागू असणार आहे. मुंबई गोवा महामार्गावर वाकण फाटा ते कशेडी, माणगाव निजामपूर मार्गे रायगड, माणगाव ढालघर फाटा मार्गे रायगड आणि महाड नातेखिंड मार्गे रायगड या मार्गावर ही बंदी लागू असणार आहे.

रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी मोठ्या प्रमाणात राज्यभरातून शिवभक्त हे मोठ्या संख्येने रायगडावर गर्दी करत असतात. अशातच यशिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांची कोणतीही गैरसोय होऊ नये यासाठी रायगड जिल्हाधिकारी यांनी हा निर्णय घेतला आहे. 

शिवाजी महाराजांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा

6 जून 1674 रोजी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला. ज्याने भारतात हिंदवी स्वराज्याची सुरुवात झाली. हा ऐतिहासिक दिवस छत्रपती शिवाजी महाराज यांच्या रायगड किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा केला जातो. यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज यांचा 352 वा शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जाणार आहे. 

यासाठी लाखो शिवभक्त आणि महिला या सोहळ्यासाठी रायगडावर येणार आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा प्रशासनाने मोठ्या प्रमाणात वाहतुकीमध्ये बदल केले आहेत. शिवभक्ताना रायगडावर जाताना वाहतुकीचा सामना करावा लागणार नाही. कारण यावेळी जिल्हाधिकारी यांनी मुंबई-गोवा महामार्गावर जड आणि अवजड वाहनांना बंदी घातली आहे. त्यामुळे हा शिवराज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात आणि सुरळीत पार पडणार आहे. 

शिवराज्याभिषेक सोहळा उपक्रम

रायगडावर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा पार पडणार आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात उपाय योजना करण्यात आल्या आहेत. शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडावर कोणते उपक्रम असतात. यामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा पालखी आणि पूजा, शिवाजीकालीन युद्धकला आणि रायगड किल्ल्यावर प्रदर्शन, मलखांब आणि इतर क्रीडा उपक्रमांसह साजरा केला जातो. यावेळी मोठ्या प्रमाणात शिवभक्त रायगडावर उपस्थित असतात. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp