digital products downloads

Mumbai Metro प्रशासनाकडून दिव्यांगांची थट्टा, तिकीट सवलतीसाठी ठेवली संतापजनक अट!

Mumbai Metro प्रशासनाकडून दिव्यांगांची थट्टा, तिकीट सवलतीसाठी ठेवली संतापजनक अट!

Metro Concessions: मुंबई मेट्रो सुरु झाल्यापासून मुंबईकरांचा प्रवास वेगाने होऊ लागलाय. दररोज लोकलचे धक्के खाणाऱ्या मुंबईकरांना मेट्रोने उत्तम पर्याय दिला. रोज हजारो प्रवासी मेट्रोतून प्रवास करतायत. दरम्यान मेट्रोने दिव्यांगांसाठी प्रवासी तिकिटात सवलत जाहीर केली. पण ही सवलत देताना एक अट देखील ठेवली, ज्यावरुन मेट्रो प्रशासनावर टीका होतेय. ही अट ठेवून मेट्रो प्रशासनाने दिव्यांगांची थट्टा केल्याची भावना प्रवासी व्यक्त करत आहेत. 

Add Zee News as a Preferred Source

मुंबई मेट्रोने 23 नोव्हेंबरपासून दिव्यांगांसाठी 25 टक्के तिकीट सवलत जाहीर केली. पण ही सवलत फक्त MetroConnect-3 अॅपद्वारे मिळते आणि सध्या हे अॅप फक्त iOS (आयफोन) वरच कार्यान्वित आहे. अँड्रॉइड व्हर्जन अद्याप Google Play Store च्या मंजुरीअभावी उपलब्ध नाही. परिणामी, देशातील 90 टक्क्याहून अधिक दिव्यांग जे स्वस्त अँड्रॉइड फोन वापरतात, ते या सवलतीपासून पूर्णपणे वंचित राहिले आहेत. त्यामुळे दिव्यांग प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.

iPhone मध्यमवर्गीय दिव्यांगांच्या आवाक्याबाहेर

आयफोनची किंमत 80 हजार ते दीड लाखांपर्यंत असते. बहुसंख्य दिव्यांगांना रोजगार, उत्पन्न आणि आर्थिक सुविधा मर्यादित असतात. त्यामुळे “आयफोन असला तरच सवलत” ही अट म्हणजे गरीब-मध्यमवर्गीय दिव्यांगांवर अन्याय असल्याची भावना आहे. मेट्रो प्रशासनाने दिव्यांगांचे केलेले हे क्रूर थट्टा असल्याची प्रतिक्रिया दिव्यांग कार्यकर्ते दिपक कैतके यांनी व्यक्त केलीय.

तांत्रिक अडचण आधी का सोडवली नाही?

मेट्रो प्रशासनाने यावर आपले स्पष्टीकरण दिले आहे. अँड्रॉइड अॅप Google च्या तपासणीत अडकले आहे. पण जेव्हा बहुसंख्य भारतीय अँड्रॉइड वापरतात हे माहिती असताना, अॅप पूर्णपणे तयार झाल्याशिवाय सवलत कशी जाहीर केली? दिव्यांगांना अर्धवट सुविधा देऊन त्यांचीच गैरसोय का केली? असे प्रश्न विचारले जात आहेत.

मेट्रोतील मूलभूत सुविधाही अपुऱ्या

आजही अनेक मेट्रो स्थानकांवर रॅम्प, ब्रेल लिपी, ध्वनी सूचना, लिफ्ट यांची कमतरता आहे. प्रवासासाठी अनेक दिव्यांगांना मदतनीसाची गरज भासते. अशा वेळी केवळ 25% सवलत नव्हे, तर दिव्यांगांसाठी मेट्रो प्रवास पूर्णपणे मोफत असायला हवा, असा युक्तिवाद कार्यकर्ते करत आहेत.

आठवलेंकडून मोफत प्रवासाची मागणी

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून दिव्यांगांसाठी मुंबई मेट्रो पूर्णतः मोफत करण्याची मागणी केली आहे. तसेच अँड्रॉइड अॅप तात्काळ उपलब्ध करून सर्व दिव्यांगांना समान सवलत मिळेल याची दक्षता घेण्याचे आवाहन केले आहे. ही सवलत श्रीमंत आयफोनधारक दिव्यांगांसाठीच मर्यादित राहिली तर ती खरी सवलत नव्हे, तर दिव्यांग समाजाशी केलेली प्रशासनिक थट्टा ठरेल, अशी प्रतिक्रिया प्रवाशांकडून व्यक्त केली जातेय.

FAQ

प्रश्न: मुंबई मेट्रोत दिव्यांगांसाठी नेमकी किती सवलत जाहीर झाली आणि ती कशी मिळते?

उत्तर: २३ नोव्हेंबर २०२५ पासून दिव्यांगांना मेट्रोत २५ टक्के तिकीट सवलत जाहीर झाली आहे. ती फक्त MetroConnect-3 अॅपद्वारे सक्रिय होते. पण सध्या हे अॅप फक्त आयफोन (iOS) वरच उपलब्ध आहे; अँड्रॉइड व्हर्जन अद्याप Google Play Store च्या मंजुरीच्या प्रतीक्षेत आहे. म्हणून बहुसंख्य दिव्यांगांना ही सवलत प्रत्यक्षात मिळत नाही.

प्रश्न: आयफोन नसेल तर दिव्यांगांना सवलत मिळणारच नाही का?

उत्तर: सध्या तरी होय. मेट्रो प्रशासनाने सांगितलंय की अँड्रॉइड अॅप लवकरच येईल, पण तारीख निश्चित नाही. जोपर्यंत अँड्रॉइड व्हर्जन उपलब्ध होत नाही, तोपर्यंत अँड्रॉइड फोन असलेले दिव्यांग या २५% सवलतीपासून पूर्णपणे वंचित राहतील. त्यामुळेच ही योजना “आयफोनवाल्यांनाच सवलत” अशी झाली आहे.

प्रश्न: दिव्यांगांना मेट्रो पूर्णपणे मोफत करावी अशी मागणी कोणी केली आहे?

उत्तर: केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून मुंबई मेट्रोत दिव्यांगांसाठी पूर्णपणे मोफत प्रवासाची मागणी केली आहे. तसेच अँड्रॉइड अॅप तात्काळ उपलब्ध करून सर्व दिव्यांगांना समान सवलत मिळेल याची व्यवस्था करण्यात यावी, असंही त्यांनी सुचवलं आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp