
Nasa Reaserch: नासा अंतराळात विविध मोहिम राबत असते. यातून अंतराळातील अनेक गोष्टी जगासमोर येतात. अंतराळात बराच वेळ घालवल्यानंतर अंतराळवीराच्या शरीरावर काय परिणाम होतो? याचे अनेक निष्कर्ष आतापर्यंत जगासमोर येऊ लागले आहेत. सुमारे 9 महिन्यांनी अंतराळ स्थानकावरून परतलेल्या सुनीता विल्यम्स यांनाही याचा फटका बसलाय. हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी अमेरिकन अंतराळ संस्था नासाने एक महत्वपूर्ण अभ्यास केलाय. नासाने आपल्या संशोधनासाठी अवकाशात एक उंदीर पाठवला. शून्य गुरुत्वाकर्षणाच्या जागेचा उंदरांच्या हाडांवर काय परिणाम होतो? हे शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. संशोधनात अनेक आश्चर्यकारक गोष्टी समोर आल्या. याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
नासाने फक्त हाडांवरच संशोधन का केले?
अवकाशातील शून्य गुरुत्वाकर्षण शरीराच्या अनेक भागांवर परिणाम करते. पण त्याचा हाडांवर किती परिणाम होतो? हे नासाला जाणून घ्यायचे होते. यासाठी उंदीर आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात पाठवण्यात आला. उंदराच्या हाडांना नुकसान झाले होते, असे संशोधनातून दिसून आले. त्यांची घनता कमी झाली पण सर्व हाडांची नाही.
संशोधनाच्या 5 मोठ्या गोष्टी
शून्य गुरुत्वाकर्षणाचा उंदराच्या पायाच्या हाडांवर सर्वात जास्त परिणाम झाला. त्याची घनता कमी झाली आणि ती कमकुवत झाली, असे नासाच्या संशोधनातून असे दिसून आले. संशोधनातील सर्वात आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे उदरांच्या पायांची हाडे कमकुवत झाली पण पाठीच्या हाडांवर कोणताही परिणाम झाला नाही. पाठीच्या कण्यामध्ये कोणतेही बदल दिसून आले नाहीत. नासाच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, शून्य गुरुत्वाकर्षणात हाडे अकाली वृद्धत्वाला सुरुवात करतात. त्यांच्यामध्ये अकाली वृद्धत्व दिसून आले आहे. अंतराळात पायांच्या हाडांवर नकारात्मक परिणाम होतो, असेही यात दिसलं. नासाने अंतराळ स्थानकावर उंदरांसाठी एक 3D वायर पृष्ठभाग तयार केला. त्यावर चढता यावे म्हणून एक पृष्ठभाग तयार करण्यात आला. त्याच्या पायांच्या हालचालीवरून आणि तो ज्या पद्धतीने चढत होता त्यावरून हाडांची ताकद आणि टिकाऊपणा समजून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याच वेळी काही उंदरांना पिंजऱ्यात ठेवण्यात आले. जे उंदीर शारीरिक हालचाल करू शकले त्यांच्या हाडांना कमी नुकसान झाले. पिंजऱ्यात बंद असलेल्यांच्या हाडांमध्ये नकारात्मक परिणाम अधिक दिसून आले.शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिलेल्या उंदरांच्या हाडांना कमी नुकसान झाले.
अंतराळात हाडे 10 पट वेगाने होतात खराब
अंतराळात हाडांचे क्षय होणे हे ऑस्टियोपोरोसिससारखेच असते, पण ते पृथ्वीपेक्षा दहापट वेगाने होते. सहा महिन्यांच्या मोहिमांवर असलेले अंतराळवीर त्यांच्या एकूण हाडांच्या घनतेच्या 10% पर्यंत कमी करू शकतात, ज्यामुळे फ्रॅक्चरचा धोका वाढतो, असे संशोधनातून समोर आलं. अभ्यासाचे हे निकाल नासाला पुढील मोहिमेची तयारी करण्यास मदत करणार आहेत.
अभ्यासाचा तुम्हाला कसा होईल फायदा?
उंदराच्या पाठीच्या हाडांना कोणतेही नुकसान झाले नाही. यातून अवकाशातील किरणोत्सर्गापेक्षा सूक्ष्म गुरुत्वाकर्षण हे बिघाडाचे मुख्य कारण असल्याचे संशोधनातून सिद्ध झाले. संशोधकांनी अंतराळयानावर चांगल्या व्यायाम करणे, तसेच तशी उपकरणे असणे याचे महत्व या संशोधनाने अधोरेखित केले. हाडांच्या खराब होण्यामुळे क्रू सदस्यांना गंभीर आरोग्य धोके निर्माण होऊ शकतात. म्हणूनच पुढील मोहिमेत यातून धडे घेता येतील. त्यामुळे भविष्यातील मंगळ मोहिमांसाठी हे परिणाम समजून घेणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.