digital products downloads

NCP च्या विलिनीकरणानंतर ‘हा’ नेता होणार होता प्रदेशाध्यक्ष; अजित पवारांनीच दिला होता प्रस्ताव, रोहित पवारांनी नावच घेतलं

NCP च्या विलिनीकरणानंतर ‘हा’ नेता होणार होता प्रदेशाध्यक्ष; अजित पवारांनीच दिला होता प्रस्ताव, रोहित पवारांनी नावच घेतलं

Rohit Pawar on NCP Alliance State President: अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित झाला आणि अनेक दावे करण्यात आले. एकीकडे शरद पवार गटाकडून विलिनीकरणाची चर्चा झाल्याचे दावे होत असताना, दुसरीकडे मात्र अजित पवार गटाकडून वारंवार फेटाळण्यात आले. त्यातच आता रोहित पवारांनी एक नवा दावा केला आहे. जर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं असतं तर नव्या प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती होणार होती. रोहित पवारांनी त्यांचं नावच सांगितलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

‘अमोल कोल्हे होणार होते प्रदेशाध्यक्ष’

रोहित पवारांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, “एनडीएसोबत राहायचं की बाहेर पडायचं ही अजित पवार आणि आमच्यात झालेली चर्चा आहे. अजित पवार आज नाहीत, त्यामुळे त्यावर चर्चा करणं योग्य नाही असं आम्हाला वाटतं. अजित पवारांना त्यांच्या पक्षात अनके बदल करायचे होते. प्रदेशाध्यक्षपदी कोणीतरी तरुण असावं असं त्यांना वाटत होतं. त्यांनी अमोल कोल्हे यांच्या नावाचा प्रस्ताव दिला होता. त्यामुळेच अमोल कोल्हे अनेक बैठकांमध्ये होते. त्यादृष्टीने चर्चा होत होत्या. पण आज दादा राहिले नाहीत, ज्यांच्यासोबत आम्हाला कंफर्ट होता. त्यांची भावनिक इच्छा होती, राजकीय इच्छा दुय्यम होती. दोन्ही पक्ष कुटुंब एकत्र यावेत असं त्यांना वाटत होतं”.

‘दादा नसताना 200 पट ऐवजी 150 पट ताकदच लावली’

“जेव्हा नगरपरिषद, नगरपंचा़यत, महापालिका निवडणुका झाल्या तेव्हा अजित पवार सर्व नियोजन पाहत होते. आज निवडणूक लढत असताना मार्गदर्शक प्रमाणपत्र कागदपत्रांची गरज असते. एखादी मोठी निवडणूक असेल तर ती जास्त लागतातय. सगळं नियोजन दादा करायचे. पण त्या कागदांचं वाटप दुसरा नेता करायचा. 28 तारखेला जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीसाठी योग्य नियोजन झालं होतं. मार्गदर्शक कागदपत्रांच्या माध्यमातून 200 पट ताकद लावली जाणार होती. पण दुर्दैवाने त्याआधी दादांचं निधन झालं. दादा नसताना 200 पट ताकद लावली जाणार होती, तिथे 50 पट लावली. 150 पट लावल्याने उमेदवार कमकुवत आणि एकटे पडले. 150 पट ताकद कोणी कमी लावली याच्या खोलात जावं लागेल,” असं रोहित पवार म्हणाले आहेत.

“तपास करत असताना तांत्रिक तपास महत्त्वाचा असतो. क्रिमिनिल असेल तर एक दिवस, एक महिना आधी काय घडलं? कोण कसं वागत आहे? या सगळ्या गोष्टी पाहिल्या तर त्याला योग्य तपास म्हणू शकतो. क्रिमिनिल आणि तांत्रित तपास व्हावा. यात मोठं रिस्ट्रक्चरिंग कऱण्याची गरज आहे,” असंही मत त्यांनी मांडलं. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp