digital products downloads

New Toll Policy: वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; वार्षिक पास, FASTag संदर्भात ‘असे’ असणार नियम!

New Toll Policy: वाहन चालकांसाठी आनंदाची बातमी; वार्षिक पास, FASTag संदर्भात ‘असे’ असणार नियम!

New Toll Policy: टोल हा वाचनचालकांसाठी नेहमीच चिंतेचा विषय असतो. रस्त्याची दुरावस्था असली तरी मोठ्या रकमेचा टोल घेतला जातो, वारंवार टोलनाक्यावर थांबायला लागतं, अशा तक्रारी वाहनचालक करत असतात. दरम्यान सर्वसामान्य वाहनचालकांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्गांवरील टोलशी संबंधित समस्या सोडवण्यासाठी नवीन टोल धोरण प्रस्तावित आहे. यामुळे टोल शुल्कात सरासरी 50 टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल आणि लोकांना 3 हजार रुपयांच्या एकरकमी किमतीत वार्षिक पासची सुविधा देखील उपलब्ध होईल. हा पास राष्ट्रीय महामार्ग आणि द्रुतगती महामार्ग तसेच राज्य द्रुतगती महामार्गांवर वैध असणार आहे. यासाठी वेगळा पास घेण्याची आवश्यकता नाही, तर फी फक्त फास्टॅग खात्याद्वारे भरता येणार आहे. नवीन टोल धोरण जवळजवळ तयार आहे आणि ते कधीही जाहीर केले जाऊ शकते. तसेच ठराविक वेळेत टोल नाके काढून टाकण्याचा संकल्पही नवीन टोल धोरणांमध्ये करण्यात आलाय.

वर्षभराचा पास

नवीन टोल धोरण टोल प्लाझावरील व्यवस्थेऐवजी प्रति किलोमीटर निश्चित शुल्कावर आधारित असेल. साधारणपणे एका गाडीला प्रत्येक शंभर किलोमीटरसाठी पन्नास रुपये टोल शुल्क द्यावे लागेल. नवीन टोल धोरण तयार करण्याशी संबंधित एका सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ‘सध्या फक्त मासिक पास दिले जातात. ज्यामुळे स्थानिक लोकांना टोल प्लाझा ओलांडण्यात दिलासा मिळतो. पण नवीन धोरणानुसार 3 हजार रुपयांचा वार्षिक पास मिळवून एक कार वर्षभर अमर्यादित किलोमीटर प्रवास करू शकते. हा पास असल्यास कोणत्याही एक्सप्रेसवे किंवा महामार्गावर कारला कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही.

अशी होणार नुकसान भरपाई

सवलतीधारक आणि कंत्राटदारांचे सध्याचे करार हे नवीन टोल धोरणात अडचण बनत चालले होते. ज्यात अशा सुविधेसाठी कोणतीही तरतूद नव्हती. त्यांच्या आक्षेपांचे निराकरण करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने त्यांना नुकसान भरपाई देण्यास सहमती दर्शविली आहे. सवलतीधारक त्यांच्या टोल प्लाझावरून जाणाऱ्या वाहनांचे डिजिटल रेकॉर्ड ठेवतील आणि त्यांचा दावा आणि प्रत्यक्ष वसुली यातील फरक सरकारकडून मिळेल, अशी माहिती सुत्रांकडून देण्यात आली आहे. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वाहनांसाठी वेगवेगळे वयोमर्यादा नियम आहेत.  यावर बँकांच्या अनिच्छेमुळे सरकारने आता आजीवन पास देण्याचा विचार सोडून दिलाय. यापूर्वी 15 वर्षांसाठी वैध असलेला आजीवन पास 30 हजार रुपयांत देण्यावर सर्वांचे एकमत झाले नाही. यासाठी ग्राहक पुढे येण्याची शक्यताही कमी होती.

अडथळामुक्त इलेक्ट्रॉनिक टोलिंग प्रणाली

नवीन टोल धोरण अडथळामुक्त इलेक्ट्रॉनिक टोलिंगला प्रोत्साहन देणारे असणार आहे. यासंबंधी 3 पायलट प्रकल्पांचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत. जर एखादे वाहन टोल न भरता रस्त्याच्या नेटवर्कवरून बाहेर पडले तर टोल कसा वसूल केला जाईल? याविषयी बँकांना असलेली चिंतादेखील दूर करण्यात आली आहे. यासाठी बँकांना अधिक अधिकार दिले जातील. ते फास्टॅगसह इतर पेमेंट पद्धतींमध्ये किमान शिल्लक आवश्यकता आणि जास्त दंड आकारू शकतात.

नवीन सुविधा कुठून सुरू होईल?

या वर्षाच्या अखेरीस देशभरात अडथळामुक्त इलेक्ट्रॉनिक टोलिंगसाठी ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन (ANPR) प्रणाली लागू केली जाईल. दिल्ली-जयपूर महामार्गावरुन याची सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. धोकादायक साहित्य वाहून नेणाऱ्या जड वाहनांपासून आणि ट्रकपासून याची सुरुवात होईल. संपूर्ण नेटवर्क मॅप करण्यात आले आहे. नवीन तंत्रज्ञानाअंतर्गत सर्व भागात सेन्सर आणि कॅमेरे बसवले जातायत. FASTag आणि ANPR एकत्रितपणे नवीन काळातील टोल प्रणालीच्या गरजा पूर्ण करतील, असा विश्वास व्यक्त करण्यात येतोय. 

बेकायदेशीर आणि निष्क्रिय फास्टॅग ही एक मोठी समस्या आहे. टोल प्लाझावरील गर्दी आणि लोकांना होणारी गैरसोय या समस्येचे निराकरण करण्यासाठी बैठका घेतल्या जात आहेत. गेटजवळ पोहोचल्यानंतरही स्कॅनर व्यवस्थित काम करत नाहीत त्यामुळे वाहने पुढे-मागे हलवावी लागतात, अशी तक्रार वाहनचालक करत असतात. ही समस्या जागतिक एजन्सींच्या मालकीच्या टोल प्लाझांमध्येही उद्भवते. ही समस्या स्थानिक तंत्रज्ञानाची आहे. जर फास्टॅग योग्यरित्या लावला नसेल किंवा अनधिकृत असेल तर सेन्सर रिसेट होण्यास वेळ लागतो, अशी माहिती देण्यात आली.

अधिकाऱ्यांकडून निर्देश

सरकारने गेल्या वर्षी एक वाहन, एक फास्टॅग धोरण लागू केले होते. यानंतर एक कोटी फास्टॅग रद्द करण्यात आले. पण अजूनहीबेकायदेशीर किंवा निष्क्रिय झालेल्या फास्टॅगची संख्याही तितकीच आहे. असे असले तरी ते वाहनांमधून काढले गेले नाहीत. टोल चालकांनी अशी वाहनांना पॉइंटआऊट करावी, असे निर्देश अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp