
Pahalgam Terrorist Attack : पर्यटनासाठी कायमच अनेकांच्या प्राधान्यस्थानी असणाऱ्या काश्मीरमध्ये नुकत्याच झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर एका क्षणात या नंदनवनाची काया लयास गेल्याचं पाहायला मिळालं. देशाच्या विविध भागांतून इथं आलेल्या पर्यटकांवर, त्या निष्पापांवर दहशतवाद्यांनी बेछूट गोळीबार केला आणि त्यात अनेक बळी गेले. संपूर्ण जम्मू काश्मीरमध्ये सध्या भीतीचं वातावरण पसरलं असून, तिथं अडकलेल्या पर्यटकांना माधारी आणण्यासाठी विविध राज्य शासनं पुढे सरसावली आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीनंसुद्धा राज्यातील पर्यटकांना माघारी आणण्यासाठी विशेष तरतूद करत शासनाचं प्रतिनिधीत्वं करणारे कॅबिनेट मंत्रीसुद्धा काश्मीरमध्ये दाखल झाले आहेत.
किती वाजता मुंबईत दाखल होणार विमान?
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. श्रीनगरहून पर्यटकांना घेऊन दोन विमान मुंबईत येणार आहेत. पर्यटकांच्या परतीच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. तर गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये कालच पोहोचलेले आहेत. इंडिगोचx विमान अंदाजे 3 वाजता, तर एअर इंडियाचे विमान अंदाजे 4 वाजता मुंबईत दाखल होईल.
काश्मीरमधून महाराष्ट्रातील पर्यटक स्वगृही कधी परतणार? गिरीश महाजन थेट श्रीनगरमधून म्हणाले…
काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांना आणण्यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. श्रीनगरहून पर्यटकांना घेऊन दोन विमान मुंबईत येणार आहेत. पर्यटकांच्या परतीच्या प्रवासाचा संपूर्ण खर्च राज्य सरकार करणार आहे. तर गिरीश महाजन आणि एकनाथ शिंदे श्रीनगरमध्ये बुधवारी पोहोचले आहेत. दरम्यान सध्या ज्या पर्यटकांच्या परतीची तिकीटं दोन दिवसांमध्ये आहेत त्यांनी घाई न करता त्यानुसार परतीचा प्रवास करावा. सध्या काश्मीरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असल्याची हमीसुद्धा महाजन यांनी दिली.
महाराष्ट्रातील पर्यटकांसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी…
काही अडचणी असल्यास संपर्क साधावा. 9763405899 हा ओएसडी संजय जाधव यांचा दूरध्वनी क्रमांक असून, काही अडचणी आल्यास महाराष्ट्रातील पर्यटकांनी मदतीसाठी संपर्क साधावा असं आवाहन गिरीश महाजन यांनी केलं. काहीही अडचण असल्यास आम्हाला कळवा अशी विनंती त्यांनी नागरिकांना केली. यादरम्यान 500 हून अधिक पर्यटकांना स्वगृही परत पाठवण्याचं काम हाती घेण्यात आल्याचं महाजन म्हणाले.
वेस्टर्न कमांड हाय अलर्टवर…
पहलगाम हल्ल्यानंतर नौदलाच्या वेस्टर्न कमांडला व संपूर्ण वेस्टर्न युद्धनौका ताफ्याला दक्षतेची सूचना देण्यात आली आहे. महत्त्वाच्या युद्धनौका उच्च दर्जाच्या तयारीसह सज्ज झाल्या आहेत. पश्चिम नौदल हा नौदलाचा ‘स्वॉर्ड’ म्हणजेच सामरिकदृष्ट्या महत्त्वाचा कमांड आहे. त्यामुळे पाकिस्तानशी निगडित कुठल्याही स्तराचे तणावपूर्व संबंध निर्माण झाल्यास कमांड सर्वप्रथम दक्षतेवर असतो. अशीच दक्षतेची सूचना आता कमांडला देण्यात आली आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.