
हगड किल्ल्यावर फिरायला गेलेला तरुण बेपत्ता झाला होता. रविवारी सायंकाळी 24 ऑगस्ट रोजी गौतम गायकवाड मित्रांसोबत फिरायला गेला असता तो लघुशंकेला गेला असता बराचवेळ आला नाही. त्यामुळे मित्रांनी शोधाशोध सुरु केली पण गौतम काही सापडला नाही. पोलिसांना 4 दिवस तपास करुन बेपत्ता तरुणाचा शोध घेतला आहे. हा तरुण सापडला असून पोलिसांना या संशोधनात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
नेमकं काय घडलं?
20 ऑगस्ट रोजी पुण्यातील सिंहगडावरुन 24 वर्षीय गौतम गायकवाड हा तरुण बेपत्ता झाला होता. सुरुवातीला त्याच्या मित्रांनी शोध घेतला पण तो सापडला नाही तेव्हा त्यांनी 100 नंबरला फोन करुन माहिती दिली. पोलिसांनी तपास केला. मात्र गौतम सापडला नाही. 67 लोकांनी जवळपास 4 दिवस तपास केला असून तरुणाचा तपास लागला आहे.
कुठे सापडला तरुण?
गौतम गायकवाड हा तरुण गावकऱ्यांना एका दरीत दिसला. या दरीत हालचाल झालेली दिसली तेथे जाऊन पाहिल्यास गौतम गायकवाड दिसला. स्थानिकांनी गौतमला सिंहगडाच्या पार्किंगजवळ आणलं. हवेली पोलिसांनी गौतम गाकवाडच आहे का याची खात्री करण्यात आली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु असून पोलीस चौकशी करत आहेत.
स्वतःच रचला अपहरणाचा बनाव
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तपासातून अशी माहिती समोर आळी आहे की, गौतम चुकून हरवला नव्हता. तर हा त्याने स्वतःहून बनाव रचला होता. गौतमवर जवळपास 18 लाखांचं कर्ज आहे. त्यामुळे त्याने स्वतऋच्या अपहरणाचा बनाव केला होता. गौतम गायकवाडने लघुशंकेला जाताना त्याचा फोन मित्राकडे दिला. 4 दिवसांत त्या फोनवर दोन असे फोन आले. ज्यामधून कळलं की, गौतमने एका व्यक्तीकडून 10 लाख तर दुसऱ्या व्यक्तीकडून 8 लाख रुपये घेतले. याचमुळे त्याने आपल्या हरवण्याचा बनाव रचला होता.
FAQ
कोण बेपत्ता झाला होता?
गौतम गायकवाड, वय 24 वर्षे, पुण्यातील सिंहगड किल्ल्यावर 20 ऑगस्ट 2025 रोजी बेपत्ता झाला होता.
गौतम कसा बेपत्ता झाला?
20 ऑगस्ट रोजी गौतम मित्रांसोबत सिंहगड किल्ल्यावर फिरायला गेला होता. लघुशंकेसाठी गेल्यावर तो परत आला नाही. त्याच्या मित्रांनी शोधाशोध केली, पण तो सापडला नाही, त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळवले.
पोलिसांनी काय केले?
हवेली पोलिसांनी 67 लोकांच्या मदतीने 4 दिवस तपास केला. शोधकार्य सुरू केल्यानंतर गौतमचा शोध लागला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.