
Pune Gang War : पुण्यातील आयुष कोमकरच्या हत्या प्रकरणात मोठा खुलासा समोर आला आहे. पुण्यातील गँग वॉरमध्ये दररोज नवं नवे धक्कादायक खुलासे होत आहेत. गोळीबार करून आयुष कोमकरचा खून केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आंदेकर टोळीच्या चौकशीत पुणे पोलिसांना महत्त्वाची माहिती हाती लागली आहे. सोमनाथचा मुलगा आयुष कोमकरच नाही नाही तर गायकवाड टोळीतील सदस्य आंदेकर टोळीच्या रडारवर असल्याचे उघड झाले आहेत. सोमनाथ गायकवाड याच्या मुलाच्या हत्येचा कट होता अशी माहिती पोलिसांनी मिळाली होती. पण जसं जसं पोलीस या घटनेच्या खोलात जात आहेत, धक्कादायक खुलासे होत आहेत. पुण्यात मोठ्या गँगवॉर होण्याचा मोठा कट होता, असं समोर आलं आहे.
आतापर्यंत पुणे पोलिसांनी आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुष कोमकर यावर गोळीबार करून हत्या केल्याप्रकरणी बंडू आंदेकर आणि तेरा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी आरोपी यश पाटील आणि अमित पाटोळे यांची कोठडी 22 सप्टेंपरपर्यंत वाढवली.
गुजरात कनेक्शन, पुणे पोलिसांची मोठी कारवाई!
पुणे पोलिसांनी आयुष कोमकर हत्या प्रकरणात आतापर्यंत 8 जणांच्या मुसक्या आवळल्या आहोत. आता या प्रकणात पोलिसांनी गुजरातमध्ये धाड टाकत आंदेकर कुटुंबातील आणखी चार जणांना बेड्या ठोकल्या आहेत. शिवम आंदेकर, शिवराज आंदेकर, अभिषेक आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर यापूर्वी आंदेकर टोळीचा मुख्य बंडूअण्णा राणोजी आंदेकर, तुषार वाडेकर, स्वराज वाडेकर, वृंदावनी वाडेकर, तसंच अमन युसूफ पठाण उर्फ खान, सुजल मेरगूला बुलढाण्यातून अटक झाली आहे. तर अमित पाटोळे, यश पाटील या दोघांना पोलिसांनी हत्येच्या दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली होती.
आयुष कोमकर हत्या प्रकरण काय आहे?
पुण्यातील या गँगवॉरची सुरुवात 1 सप्टेंबर 2024 रोजी नाना पेठमध्ये राष्ट्रवादीचा माजी नगरसेवक वनराज आंदेकर याची हत्या झाल्यानंतर झाली. आंदेकर हत्याप्रकरणी पोलिसांनी गणेश कोमकर, संजीवनी कोमकर, जयंत कोमकर आणि इतरांसह 21 आरोपींना अटक केली होती. पण दुसरीकडे आयुष कोमकरचा वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणात त्याचा कोणताही संबंध नसल्याचं पोलीस तपासातून उघड झालं खरं पण…
वनराज आंदेकरच्या हत्येनंतर संतापलेल्या आंदेकर टोळीच्या सदस्यांनी त्याच्या अंत्यविधीवेळी शस्त्रपूजन करून बदला घेण्याची शपथ घेतली. त्या दिशेने 1 सप्टेंबर रोजी प्लॅनही आखला गेला. वनराज आंदेकरच्या हत्या प्रकरणातील आरोपींची रेकी झाली. पण पोलिसांना याची माहिती मिळाली आणि हा प्लॅन उधळण्यात त्यांना यश आलं.
गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी आरती झाल्यानंतर पुण्यातील नाना पेठेमध्ये गोळ्यांचा आवाज गुंजला. एकीकडे एका गणेश मंडळामध्ये डीजेवर ‘टपका रे टपका, एक ओर टपका’ हे गाणं वाजत होतं. तर दुसरीकडे आयुष कोमकरची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. वनराज आंदेकरच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आंदेकर टोळीने त्यांच्या भाच्याला म्हणजे आयुष कोमकरला मारत बदला घेतला.
FAQ
1. आयुष कोमकर हत्या प्रकरण नेमके काय आहे?
पुण्यातील नाना पेठ परिसरात ५ सप्टेंबर २०२५ रोजी गणेश विसर्जनाच्या आदल्या दिवशी १९ वर्षीय आयुष कोमकर याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आयुष हे गणेश कोमकर यांचे मोठे पुत्र आणि अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते. ही हत्या आंदेकर टोळीने वनराज आंदेकर हत्येचा बदला घेण्यासाठी केली असल्याचा संशय आहे. घटनास्थळी “बंडू आंदेकर आणि कृष्णा आंदेकर” असे घोषित करून हल्लेखोर पळून गेले.
2. या हत्येचे मुख्य कारण काय आहे?
आयुष कोमकर हत्येचे मुख्य कारण वनराज आंदेकर (राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक) यांच्या १ सप्टेंबर २०२४ रोजी झालेल्या हत्येचा बदला आहे. वनराज आंदेकर हत्येत गणेश कोमकर यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. आंदेकर टोळीने सूड म्हणून गणेश कोमकर यांच्या मुलाला लक्ष्य केले. पोलिस तपासात हा पूर्वनियोजित कट असल्याचे उघड झाले आहे.
3. आंदेकर टोळी आणि कोमकर टोळी यांच्यातील वैर कसे सुरू झाले?
आंदेकर आणि कोमकर टोळ्यांमधील वैर पुण्यातील जुने गँग वॉर आहे. १ सप्टेंबर २०२४ रोजी वनराज आंदेकर यांची हत्या झाल्यानंतर आंदेकर टोळीने त्यांच्या अंत्यविधीवेळी शस्त्रपूजा करून बदला घेण्याची शपथ घेतली. यानंतर कोमकर टोळीच्या सदस्यांची रेकी सुरू झाली, आणि आयुष कोमकर हा लक्ष्य ठरला.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.