digital products downloads

Pune Traffic Update: 19 फेब्रुवारी निमित्ताने वाहतुकीत मोठा बदल, मध्यवर्ती भागातील ‘हे’ प्रमुख रस्ते काही काळ राहणार बंद

Pune Traffic Update: 19 फेब्रुवारी निमित्ताने वाहतुकीत मोठा बदल, मध्यवर्ती भागातील ‘हे’ प्रमुख रस्ते काही काळ राहणार बंद

Pune Traffic Update 19 February 2026: दरवर्षी 19 फेब्रुवारी रोजी राज्यभरात छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. यानिमित्ताने पुण्याच्या काही भागातील वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात येणार आहे. शिवजयंती निमित्ताने मिरवणुका काढल्या जातात. यावेळी मोठ्या नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता आहे. तसेच वाहतुकीचीही मोठी गर्दी होते. ही समस्या लक्षात घेता मध्यवर्ती भागातील वाहतूक कोंडीत तात्पुरता बदल होणार आहे. 

Add Zee News as a Preferred Source

कोणत्या मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली आहे? 

दरम्यान; गुरूवारी (19 फेब्रुवारी 2026 रोजी) पुण्यात मिरवणुकींमुळे मध्यवर्ती भागात हिंजवडीत वाहतुकीत मोठे बदल करण्यात आले आहेत. दुपारी 3 ते रात्री 11 वाजेपर्यंत कस्तुरी चौक ते शिवाजी महाराज चौक मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. हिंजवडी आयडी पार्कची वाहतूक विनोदे वस्ती, इंडियन ऑइल चौक मार्गे वळवली आहे. जिजामाता चौकातून स्वारगेटकडे जाणारी वाहतूक स. गो. बर्वे चौक, जंगली महराज रस्ता, खंडूजीबाबा चौक, टिळक रस्त्याने वळवली आहे. तर फडके हौद चौक आणि जिजामाता चौकाकडे येणारी वाहतूक दारूवाला पूल चौकातून वळवण्यात आली आहे. तसेच नागरिकांनी हिंजवडी आणि मुख्य शहरात प्रवास करताना पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे. 

 

आवश्यक वाहनांना प्राधान्य

तसेच मिरवणुकीच्या मार्गांवर काही काळासाठी वाहनांना प्रवेशबंदी असणार आहे. यावेळी जड वाहनांच्या येण्या-जाण्यावर निर्बंध घालण्यात आला आहे. मात्र, आपात्कालीन सेवा, रुग्णवाहिका आणि आवश्यक सेवांच्या वाहनांच्या सेवेत अडथळा येणार नाही याची काळजीही वाहतूक शाखेने घेतली आहे. काही मार्गांवरील वाहतूकसेवा बंद करण्यात आली असली तरी, आवश्यक वाहनांना प्राधान्य देण्यात येणार आहे. 

19 फेब्रुवारी निमित्ताने पुण्यात कोणते कार्यक्रम पार पडणार? 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्ताने पुण्यात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित केले जातील. शिवनेरी किल्ल्यावर हिंदवी स्वराज्य महोत्सव साजरा केला जात आहे. हा कार्यक्रम 17 फेब्रुवारी पासून सुरू झाला आहे आणि 19 फेब्रुवारी पर्यंत असणार आहे. ज्यामध्ये महिला बचत गट प्रदर्शन, शिवनेर केसरी कुस्ती स्पर्धा आणि सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील. तसेच 19 फेब्रुवारी रोजी सकाळी ऐतिहासिक शिवनेरीवरून आणलेल्या शिवज्योतीचे स्वागत आणि विविध सांस्कृतिक उपक्रम, मिरवणुकींचे आयोजन केले जाणार आहे. तसेच ढोल-ताशा पथके, पोवाडे आणि व्याख्यानांमधून महाराजांच्या शौर्याचे स्मरण असे पारंपारिक कार्यक्रम पार पडतील. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp