
Ajit Pawar and Supriya Sule: महाराष्ट्रातील राजकारणातील सर्वात मोठं पवार कुटुंब रक्षाबंधन, भाऊबीज अशा सणांवेळी एकत्र येत असतं. जेव्हा रक्षाबंधन सण सगळीकडे उत्साहात साजरा होत असतो तेव्हा अजित पवार आणि सुप्रिया सुळे या भावंडांच्या रक्षाबंधनाकडे पवार कुटुंबीयप्रेमींचे लक्ष लागून राहिलेले असते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात 2023 मध्ये फूट पडली जेव्हा अजित पवार यांनी भाजपासोबत युती करत स्वतंत्र गट स्थापन केला. निवडणूक आयोगाने पक्ष आणि ‘घड्याळ’ चिन्ह अजित गटाला दिले. दरम्यान रक्षाबंधनच्या पार्श्वभूमीवर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या शैक्षणिक प्रवासाविषयी जाणून घेऊया.
14 ऑगस्ट 2025 रोजी संपूर्ण महाराष्ट्रात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होत आहे. भाऊ-बहिणीच्या नात्याचा हा पवित्र सण प्रत्येक घरात आनंद आणि बंधनाचे प्रतीक घेऊन येतो. राजकीय क्षेत्रातील प्रमुख व्यक्तिमत्वे सुप्रिया सुळे आणि अजित पवार या भाऊ-बहिणीने रक्षाबंधनाचे फोटो सोशल मीडियात चर्चेत असतात. कार्यकर्त्यांच्या स्टेटसलाही आपण हे फोटो पाहत असतो. या सणाच्या निमित्ताने त्यांच्या शिक्षणाच्या पार्श्वभूमीवर दोघांच्या शैक्षणिक प्रवासावर एक नजर टाकूया. रक्षाबंधनाच्या या सणात सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी एकमेकांना राखी बांधून भाऊ-बहिणीच्या नात्याचा आदर व्यक्त करत असतात. टोकाचे राजकीय मतभेद असले तरी त्यांचे कौटुंबिक बंध दृढ असल्याचे यानिमित्ताने दिसून येते.
बहीण-भावातील नात्याचे बंध आणखी घट्ट करणारा सण, राखी पौर्णिमा.यानिमित्ताने माझे भाऊ @AjitPawarSpeaks दादा यांचे औक्षण करुन त्यांना राखी बांधली. तुम्हा सर्वांना या सणाच्या हार्दिक शुभेच्छा. pic.twitter.com/Zhh7FNbnss
— Supriya Sule (@supriya_sule) August 3, 2020
सुप्रिया सुळे कितवी शिकल्यायत?
शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आपले शालेय शिक्षण पुण्यातील सेंट कोलंबस स्कूलमधून पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी मुंबईतील जय हिंद महाविद्यालयातून मायक्रोबायोलॉजी विषयात बी.एस्सी. पदवी मिळवली. सुप्रिया यांनी पुढील शिक्षणासाठी अमेरिकेतील कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटी, बर्कले येथून वॉटर पोल्युशन या विषयात मास्टर्स डिग्री प्राप्त केली.
रक्षाबंधन!
उत्सव भाऊ-बहीणीच्या नात्याचा…!@AjitPawarSpeaks pic.twitter.com/G5A06GmSnN— Supriya Sule (@supriya_sule) August 11, 2022
पर्यावरण आणि सामाजिक प्रश्नांचा अभ्यास
या शिक्षणामुळे त्यांना पर्यावरण आणि सामाजिक प्रश्नांबाबत सखोल आकलन झाले, जे त्यांच्या राजकीय कारकीर्दीतही दिसून येते. त्यांनी इंडोनेशिया आणि सिंगापूर येथेही काही काळ वास्तव्य केले, ज्यामुळे त्यांचा जागतिक दृष्टिकोन समृद्ध झाला. सुप्रिया यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग सामाजिक कार्यात, विशेषत: स्त्री भ्रूणहत्येविरोधी मोहिमेत केला आहे.
अजित पवार कितवी शिकलेयत?
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते, यांचे शिक्षणही उल्लेखनीय आहे. त्यांनी मुंबईतील सिदनहॅम कॉलेज ऑफ कॉमर्स अँड इकॉनॉमिक्समधून बी.कॉम. पदवी प्राप्त केली. त्यांचे शिक्षण प्रामुख्याने वाणिज्य क्षेत्रात झाले असले, तरी त्यांनी राजकीय आणि प्रशासकीय क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. अजित पवार यांनी शिक्षणानंतर राजकारणात प्रवेश केला आणि शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आपली कारकीर्द घडवली.
व्यावहारिक दृष्टिकोन आणि प्रशासकीय कौशल्य
अजित पवार यांनी त्यांच्या व्यावहारिक दृष्टिकोन आणि प्रशासकीय कौशल्य यामुळे त्यांना राज्याच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान मिळाले आहे. त्यांच्या शिक्षणाने त्यांना केवळ वैयक्तिक यशच मिळवून दिले नाही, तर महाराष्ट्राच्या विकासातही योगदान दिले आहे.
FAQ
१. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांचे नाते काय आहे?
सुप्रिया सुळे आणि अजित पवार हे भाऊ-बहीण (चुलत) आहेत. सुप्रिया या शरद पवार यांच्या कन्या असून, अजित पवार हे शरद पवार यांचे पुतणे आहेत. त्यांच्यात कौटुंबिक बंध दृढ असून, रक्षाबंधनासारख्या सणांना ते एकत्र येऊन नात्याचा आदर व्यक्त करतात.
२. सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात राजकीय मतभेद का आहेत?
२०२३ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडली, जेव्हा अजित पवार यांनी भारतीय जनता पक्षासोबत युती करत स्वतंत्र गट स्थापन केला. यामुळे सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांच्या गटाशी त्यांचे राजकीय मतभेद निर्माण झाले.
३. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील वादाची सध्याची स्थिती काय आहे?
सध्या अजित पवार आणि शरद पवार गट एकत्र येण्याच्या चर्चा सुरू आहेत. शरद पवार यांनी याबाबतचा निर्णय सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यावर सोपवला आहे. सुप्रिया यांनी हा निर्णय कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन लोकशाही पद्धतीने घेतला जाईल, असे सांगितले.
४. निवडणूक आयोगाने काय निर्णय घेतला?
निवडणूक आयोगाने ‘राष्ट्रवादी काँग्रेस’ नाव आणि ‘घड्याळ’ चिन्ह अजित पवार यांच्या गटाला दिले, ज्याला सुप्रिया सुळे यांनी ‘अदृश्य शक्तींचा विजय’ म्हणत टीका केली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.