
Maharashtra Kustigir Parishad : आताची सर्वात मोठी बातमी आहे. शरद पवार यांच्या पाऊलावर पाऊल ठेवत रोहित पवारांनी क्रिकेटनंतर अजून एका मैदानात एन्ट्री केली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. तर सचिवपदी विजय बराटे आणि इतर पदाधिकाऱ्यांही बिनविरोध निवडून आले आहेत. आतापर्यंत प्रत्येक मैदानात केलेल्या चांगल्या कामगिरीची ही पोचपावती असून या संधीचं सोनं करणार, असा आश्वासन देणारे पोस्ट रोहित पवार यांनी करत सर्वांचं आभार मानले आहेत. (Rohit Pawar elected as the President of Maharashtra Kustigir Parishad pune marathi news)
पोस्टमध्ये रोहित पवार काय म्हणालेत? (Rohit Pawar Post)
महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर रोहित पवार यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. ज्यात त्यांनी लिहिलं आहे की, महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल राज्यातील सर्व जिल्हा संघ आणि मतदारांचे मनःपूर्वक आभार! स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, स्व. मामासाहेब मोहोळ आणि आदरणीय पवार साहेब यांच्या विचारांच्या या संघटनेचं नेतृत्त्व करण्याची संधी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळतेय, हे माझं भाग्यच आहे.
आदरणीय पवार साहेबांनी तर तब्बल चार दशकं या संघटनेचं नेतृत्व केलं आणि आजही ते या संघटनेचं प्रतिनिधीत्व करत आहेत. मध्यंतरी राज्यकीय द्वेषातून संघटनेबाबत वाद निर्माण केले गेले पण या निविडणुकीच्या निमित्ताने ‘महाराष्ट्र कुस्तीगिर परिषद’ हिच खरी संघटना आहे, यावरही शिक्कामोर्तब झालं.
जिल्हा परिषद, विधानसभा, क्रिकेटनंतर आता कुस्तीच्या चौथ्या मैदानात ‘खेळण्याची’ संधी या निवडणुकीच्या माध्यमातून मिळाली. ही आजवर प्रत्येक ‘मैदानात’ केलेल्या चांगल्या कामाची पावतीच आहे, असं मी समजतो. या संधीचं सोनं करून राज्यातील कुस्तीला गतवैभव प्राप्त करुन देणं, पैलवानांना हक्काचं व्यासपीठ उपलब्ध करून देणं, त्यांना आवश्यक असलेल्या सर्व सोयी-सुविधा मिळवून देणं आणि मातीतल्या या खेळाला आभाळाइतकं मोठं करण्याचा माझा निश्चितच प्रामाणिक प्रयत्न राहील.
महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडून दिल्याबद्दल राज्यातील सर्व जिल्हा संघ आणि मतदारांचे मनःपूर्वक आभार! स्व. यशवंतराव चव्हाण साहेब, स्व. मामासाहेब मोहोळ आणि आदरणीय पवार साहेब यांच्या विचारांच्या या संघटनेचं नेतृत्त्व करण्याची संधी माझ्यासारख्या… pic.twitter.com/uhnn5raFhI
— Rohit Pawar (@RRPSpeaks) July 27, 2025
या निवडणुकीच्या निमित्ताने जिल्हा कुस्ती संघ, पैलवान, वस्ताद, पंच यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील सर्वंच मान्यवर मंडळींनी मोलाचं सहकार्य केलं. याबाबत या सर्वांचे पुनश्च आभार!
माझ्यासोबतच सचिव विजय बराटे यांच्यासह उपाध्यक्ष आणि इतर सर्वच पदांवर बिनविरोध निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचंही मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.