digital products downloads

Sangli News: ‘हिंदूंनी हिंदूकडूनच…’ अभिनेते शरद पोक्षेंचं जाहीर आवाहन; नेमकं म्हणाले काय?

Sangli News: ‘हिंदूंनी हिंदूकडूनच…’ अभिनेते शरद पोक्षेंचं जाहीर आवाहन; नेमकं म्हणाले काय?

Sharad Pokshe: सांगलीमध्ये आयोजित गृहोपयोगी वस्तू आणि साहित्य प्रदर्शनाच्या उद्घाटनावेळी ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे यांनी केलेल्या विधानांची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. हिंदू व्यवसाय बंधू आणि सर्वमंगल ग्रुप यांच्या वतीने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. आपल्या भाषणात त्यांनी धर्म, समाज आणि दैनंदिन व्यवहार यावर भाष्य करत लोकांनी आपल्या समाजातील लोकांना प्राधान्य द्यावे असे मत व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्यामुळे समर्थकांकडून प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे सामाजिक वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

Add Zee News as a Preferred Source

कार्यक्रमात मांडलेले परखड मत 
शरद पोंक्षे यांनी लोकांनी खरेदी-विक्री करताना आपल्या धर्मातील व्यापाऱ्यांना प्राधान्य द्यावे असे सांगितले. घरातील दुरुस्ती कामे करणारे कारपेंटर, प्लंबर किंवा तंत्रज्ञ देखील आपल्या समाजातील असावेत असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या मते समाज आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी परस्पर सहकार्य महत्त्वाचे आहे.
त्यांनी मालेगाव महानगरपालिकेतील मुस्लिम महिला उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतान यांचा फोटो लावल्याचा उल्लेख करत सध्याची परिस्थिती गंभीर असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे समाज जागृत राहण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

पोक्षेंचं ‘ते’ वाक्य अन् टाळ्यांचा कडकडाट 
भाषणादरम्यान त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाचा उल्लेख करत धर्माशी निष्ठा राखण्याचा संदेश दिला. परिस्थिती कठीण असली तरी आपली ओळख टिकवणे महत्त्वाचे असल्याचे ते म्हणाले. समाजाने आपल्या परंपरा आणि इतिहासाची जाणीव ठेवावी, असेही त्यांनी उपस्थितांना आवाहन केले.
त्यांच्या वक्तव्यांनंतर कार्यक्रमस्थळी उपस्थितांमध्ये टाळ्यांचा कडकडाट झाला, तर सोशल मीडियावर या भाषणाबाबत वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटू लागल्या.

पेट्रोल, डिझेल 200- 300 रुपये झाले तरी…
पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांबाबत बोलताना शरद पोंक्षे म्हणाले की किंमती वाढल्या तरी आपली भूमिका बदलणार नाही. पेट्रोल 200 रुपये किंवा डिझेल 300 रुपये झाले तरी चालेल, पण श्रद्धा आणि ओळख सोडणार नाही असे त्यांनी स्पष्ट केले. महागाई वाढली तर कमी खर्चात जगणे स्वीकारता येईल, परंतु विचार बदलणे शक्य नाही असेही ते म्हणाले.

हे ही वाचा: टिपू आणि छत्रपतींमध्ये फरक काय? ठाकरे सेनेकडून सपकाळांना इतिहासाचे धडे; 7 मुद्द्यांत समजावला फरक

सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया
या भाषणानंतर सांगलीसह राज्यभरात चर्चा सुरू झाली आहे. काही जणांनी त्यांच्या विधानांना समर्थन दिले, तर काहींनी त्यावर टीका केली. सामाजिक माध्यमांवरही याबाबत विविध प्रतिक्रिया दिसून येत आहेत. एकूणच या कार्यक्रमातील शरद पोंक्षे यांच्या वक्तव्यामुळे समाज, अर्थकारण आणि धर्म या विषयांवर पुन्हा एकदा सार्वजनिक चर्चेला चालना मिळाली आहे.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp