
सायबर गुन्हेगार हे बहुतांश वेळा सुशिक्षित लोकांना, मध्यम वयातील व ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य करतात. घरबसल्या ऑनलाईन पैसे कमवणे, बक्षीस देणे, मोफत कर्ज देणे असे आमिष दाखवून फसवितात. बँकेतून, सरकारी कार्यालयातून, विद्युत विभाग किंवा एमएनजीएल येथून बोलत
.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या गुणवत्ता सुधारणा कार्यक्रमांतर्गत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (एसबीपीआयएम) येथे महिला सबलीकरण व सक्षमीकरण या विषयावर आयोजित केलेल्या कार्यशाळेत त्यांनी मार्गदर्शन केले. यावेळी पिंपरी चिंचवड मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे, एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर, डॉ. रुपाली कुदरे, विद्याथी विकास अधिकारी डॉ.काजल माहेश्वरी आदी उपस्थित होते.
वैद्यकीय अधिकारी डॉ. वर्षा डांगे यांनी सांगितले की, शारीरिक तसेच मानसिक आरोग्य वाढवण्यासाठी सर्वांनी जाणीवपूर्वक सकारात्मक प्रयत्न केले पाहिजेत. प्रत्येकाने रोज नियमितपणे व्यायाम, प्राणायाम केला पाहिजे. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक तणाव मुक्तीसाठी वेळेचे व्यवस्थापन केले पाहिजे. सर्वांनी कुटुंबात संवाद साधून भावनिक वातावरण उत्तम राहील याची काळजी घेतली पाहिजे. नियमित व्यायाम, संतुलित आहार, शक्य असेल तेव्हा पर्यटन आणि सकारात्मक विचार याचा आपल्या जीवनशैलीत वापर केला तर यश नक्की मिळेल असे डॉ. डांगे यांनी सांगितले.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.