digital products downloads

Shirdi Saibaba Sansthan : शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात, मोठी रक्कम जाहीर

Shirdi Saibaba Sansthan : शिर्डीच्या साईबाबा संस्थानकडून पूरग्रस्तांना मदतीचा हात, मोठी रक्कम जाहीर

शिर्डी – साईबाबा संस्थानकडून अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे. साईबाबा संस्थानकडून अतिवृष्टी बाधितांच्या मदतीसाठी 5 कोटी रुपयांची मदत जाहीर केली आहे. मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात पावसाने बळीराजाचं खूप नुकसान केलं आहे. 

Add Zee News as a Preferred Source

शिर्डी संस्थानने यापूर्वी 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. पूर्वीचे 1 कोटी आणि आता पुन्हा 4 कोटी अशा 5 कोटी रुपयांचा प्रस्ताव मान्यतेसाठी उच्च न्यायालयाकडे पाठवला आहे. 50 लाख रुपयांवरील खर्चासाठी साई संस्थानला उच्च न्यायालयाची परवानगी बंधनकारक असते. ही मदत मुख्यमंत्री सहाय्यात निधीसाठी साई संस्थान देणार 5 कोटी रुपये देणार आहे. 

राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत शिर्डीचे साई संस्थान मदतीसाठी सरसावले आहे. यापूर्वीही देशातील आपत्कालीन परिस्थितीत साई संस्थाकडून भरघोस मदत दिली गेली आहे. आता राज्यातील आपत्कालीन परिस्थितीत साई संस्थानने सामाजिक बांधिलकी पुन्हा जपली आहे. 

शेतकऱ्यांच्या मदतीला येतोय अडथळा 

अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या मदतीतला मोठा अडथळा राज्य सरकारच्या वतीने दूर करण्यात आला आहे.ई केवायसीची अट राज्य सरकारकडून शिथिल करण्यात आली आहे.अतिवृष्टी बाधित अनेक शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नसल्यानं त्यांच्या खात्यावर मदत मिळणार नसल्याच्या तक्रारी होत्या.त्यामुळे मदतीपासून कोणताही शेतकरी अथवा बाधित वंचित राहू नये म्हणून राज्य सरकारच्या वतीने ई-केवायसीची अट शिथिल करण्यात आली असल्याची घोषणा राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.दरम्यान कृषिमंत्री भरणे यांच्या या घोषणेवर जालन्यातील शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहे.सरकारच्या या निर्णयाचं स्वागत आहे.आता सरकारने खरीप पिकांसाठी हेक्टरी 50 हजारांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे तर काही शेतकऱ्यांनी ई केवायसी अट शिथिल करून फायदा नाही ई-पीक पाहणीची अट रद्द करण्याची मागणी केली आहे

महाराष्ट्रातील पूरस्थिती 

महाराष्ट्रातील पुरामुळे सर्व व्यवस्था विस्कळीत झाली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यातील शिऊर येथील एक मुलगी रात्री अचानक आजारी पडली. पुरामुळे मुलीला रुग्णालयात नेण्यात अनेक अडथळे निर्माण झाले, ज्यामुळे तिला पोहोचण्यास उशीर झाला. १५ मिनिटांच्या अंतरावर रुग्णालयात पोहोचण्यासाठी दोन तास लागले. परिणामी, मुलीचा मृत्यू झाला. मुलीचे नाव वैष्णवी योगेश जाधव आहे.

तसेच, जळगाव जिल्ह्यातील एरंडोल तालुक्यातील गावे पुराच्या पाण्याखाली गेली आहेत. घरे आणि दुकाने पाण्याखाली गेली आहेत. नदीकाठाजवळ राहणाऱ्या ग्रामस्थांना बाहेर काढण्यात येत आहे. पुराच्या पाण्यात अडकलेल्या बसमधील प्रवाशांना वाचवण्यात आले आहे. नवदेवीच्या दर्शनासाठी निघालेल्या महिला भाविकांना घेऊन जाणारी बस पुराच्या पाण्यात अडकली होती. चालकासह पंधरा महिला भाविकांना यशस्वीरित्या वाचवण्यात आले.

(हे पण वाचा – राज्यातील पुरग्रस्तांसाठी सिद्धिविनायक मंदिराकडून 100000000 मदत जाहीर) 

FAQ 

महाराष्ट्रातील सध्याची पूर परिस्थिती काय आहे?
महाराष्ट्रात २७ ते २९ सप्टेंबर २०२५ दरम्यान मुसळधार पावसामुळे गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे किमान ११ जणांचा मृत्यू झाला असून, ४१,००० हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. ६० लाख हेक्टर शेतीची जमीन नुकसानग्रस्त झाली असून, १ कोटी एकर शेती प्रभावित झाली आहे. मुंबई, नाशिक, ठाणे, पालघर, रायगड, पुणे, सोलापूर, बीड आणि धाराशिवसह अनेक जिल्ह्यांत रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी आहेत. पावसाचा जोर अद्याप कायम असून, ३० सप्टेंबरपर्यंत सतर्कता बरकरार आहे.

कोणत्या जिल्ह्यांमध्ये पूर आला आहे?
प्रभावित जिल्ह्यांमध्ये मुख्यतः नाशिक, पालघर, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड, पुणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सोलापूर, बीड आणि धाराशिव (माराठवाडा विभाग) यांचा समावेश आहे. सोलापूरमध्ये १३,७२४ लोकांना आश्रयस्थळी हलवण्यात आले आहे. धाराशिवमध्ये ३,५०० हून अधिक लोक विस्थापित झाले आहेत.

पूरग्रस्तांसाठी सरकारी मदत काय आहे?
महाराष्ट्र सरकारने तात्काळ मदत उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्रभावित कुटुंबांना १०,००० रुपये आर्थिक मदत दिली जात आहे. माराठवाड्यासाठी २,००० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर झाले असून, शेतकऱ्यांसाठी पूर नुकसान भरपाई धोरण एका आठवड्यात लागू होणार आहे. जिल्हा निधीचा तात्काळ वापर करून मदत छावण्या उघडल्या जात आहेत, बचावकार्यासाठी उपकरणे भाड्याने घेतली जात आहेत आणि पिण्याचे पाणी पुरवठा पूर्ववत केला जात आहे. नुकसान मूल्यांकन अक्टोबरपर्यंत पूर्ण होईल.

 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp