digital products downloads

Shivaji Maharaj Family: शिवाजी महाराजांनी किती विवाह केले? सईबाईंसह कुटुंबात कोण कोण होतं?

Shivaji Maharaj Family: शिवाजी महाराजांनी किती विवाह केले? सईबाईंसह कुटुंबात कोण कोण होतं?

Shivaji Maharaj Family: छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्यभिषेक हा 6 जून 1974 मध्ये झाला. त्यानंतर महाराष्ट्रात 6 जूनच्या ऐतिहासिक दिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात येतो. महाराष्ट्रात या दिवशी मिरवणुका, सांस्कृतिक कार्यक्रम आणि विविध उपक्रम आयोजित करण्यात येतात. या ऐतिहासिक दिवसाच्या निमित्ताने आपण महाराजांच्या कुटुंबाबद्दल जाणून घेऊयात. 

शिवाजी महाराजांनी किती विवाह केले?

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पहिला विवाह ते 6 ते 8 वर्षांचे असताना झाला होता. त्यानंतर बंगळुरुला असताना वडील शहाजीराजे भोसले त्यांना भेटायला गेले होते. तेव्हा महाराजांच्यासमोर दुसऱ्या लग्नाचा प्रस्ताव ठेवण्यात आला. वडिलांच्या आग्रहासाठी वयाच्या 8 व्या वर्षी महाराजांचं दुसरं लग्न झालं. लहानपणाच त्यांची दोन लग्न झाली होती. इतिहासकार सांगतात महाराजांची 8 लग्न झाली होती. 

लग्नामागे होते हे कारणं!

जिजाऊ माँ साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा स्थापनेचा संकल्प घेतला. यासाठी अनेक जहागीरदारांना आणि संस्थानिकांना स्वराज्यात सामील होण्याची विनंती माँ साहेबांनी केली. पण त्यांनी माँ साहेबांसमोर एक अट ठेवली. ते म्हणाले की, शिवाजी महाराजांच्या घराण्याशी संबंध असल्यास स्वराज्यात सामील होऊ. त्यामुळे माँ साहेबांनी ही अट मान्य केली आणि शिवाजी महाराज यांचे स्वराज्यासाठी 6 लग्न झालेत. 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 8 पत्नीचं नाव काय?

पहिली पत्नी – सईबाई साहेब (निंबाळकर घराणे जे शंभाजीराजे यांच्या आई)
दुसरी पत्नी – सोयराबाई साहेब (मोहित घराणे, राजाराम महाराज यांच्या आई)
तिसरी पत्नी – पुतळाबाई साहेब (पालकर घराणे, नेताजी पालकरांची भाची)
चौथी पत्नी – सकवारबाई साहेब (गायकवाड घराणे)
पाचवी पत्नी – काशीबाई साहेब (जाधव घराणे)
सहावी पत्नी – लक्ष्मीबाई साहेब (विचारे घराणे)
सातवी पत्नी – सगुणाबाई साहेब (शिर्के घराणे)
आठवी पत्नी  – गुणवंताबाई साहेब (इंगळे घराणे)

8 विवाहातून छत्रपती शिवाजी महाराजांना किती मुलं – मुली होत्या?

इतिहासकार सांगतात छत्रपती शिवाजी महाराजांना 2 मुलं आणि 6 मुली होत्यात. महाराणी सईबाई यांचे पुत्र छत्रपती संभाजी महाराज आणि महाराणी सोयराबाई यांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराज. शिवाजी महाराजांनंतर संभाजी राजे यांनी प्रजा रयतेचा कारभार पाहिला आणि संभाजी महाराजांनानंतर राजाराम महाराज छत्रपती झालेत. 

तर छत्रपती शिवाजी महाराज यांना 6 कन्या होत्या. महाराणी सईबाई यांना सखुबाईसाहेब, राणूबाईसाहेब आणि अंबिकाबाईसाहेब अशा तीन कन्या होत्या. महाराणी सोयराबाई यांनी दीपकाबाईसाहोब, महाराणी सगुणाबाई यांना राजकुंवरबाईसाहेब आणि महाराणी सकवारबाई यांनी कमलाबाईसाहेब या कन्या होत्या. 

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp