
सोलापूरात अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका 32 वर्षीय वकिल तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्येच कारण अतिशय धक्कादायक आहे.
सोलापूर शहरात एका 32 वर्षीय तरुणाने बेडरुममध्ये गळफास लावून आत्महत्या केली आहे. सोलापुरात वकिलाने बेडरूम मध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. आईकडून दुजाभावाची वागणूक देत असल्यामुळे आत्महत्या करत असल्याची सुसाईड नोट लिहीली आहे.
सोलापुरातील सागर श्रीकांत मंद्रूपकर असं गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या वकिलाचे नाव आहे. सागर मंद्रूपकर यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवल्याचं पोलिसांच्या तपासात समोर आलं आहे. सागरने आपल्य संदर्भात चिट्टी लिहिताना सांगितलं, ”आईकडून होणारा सततचा दुजाभाव यामुळे मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येला ती जबाबदार, माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा, ही नम्र विनंती” असल्याचे दोन पानाची चिट्ठी लिहली.
सागर आणि त्याचे आईचे मंगळवारी रात्री भांडण झाले होते. सागर याचे वडील सरकारी नोकरदार तर बहिण विवाहित आहे. सोलापुरातील सिव्हील पोलीस चौकी येथे नोंद करण्यात आली आहे. विजापूर नाका पोलीस पुढील तपास करत आहेत.
वरच्या मजल्यावर दोरीच्या साहाय्याने घेतला गळफास
ऍड. सागर मंद्रूपकर याने बुधवारी दुपारी विजापूर रस्त्यावरील आपल्या राहत्या घरातील पहिल्या मजल्यावरील दोरीच्या साह्याने स्लॅबच्या छताच्या लोखंडी हुकला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. नातेवाईकांनी सागरवा बेशुद्धा अवस्थेत खाली उतरवलं. दरम्यान विजापूर नाका पोलीस ठाण्याचे हवालदार घुगे यांनी उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले.
मृत्यूचे कारण धक्कादायक
पोलिसांनी ताबडतोब तरुण वकिलाला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलीस चौकीत झाली आहे. आत्महत्येचे कारण ऐकून सगळ्यांनाच धक्का बसला आहे. .
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.



