
सोलापूर शहरातील एका धक्कादायक घटनेने संपूर्ण शहर हादरुन गेलं आहे. बलरामवाले कुटुंबात गॅसगळतीचा प्रकार घडला आहे. या गॅसगळतीमध्ये चार लोकांचा मृत्यू झाला आहे. सुरुवातीला कुटुंबातील दोन चिमुकल्यांचा म्हणजे मुलगा हर्ष (वय 6) आणि मुलगी अक्षरा (वय 4) यांचा मृत्यू झाला.
यानंतर उपचारादरम्यान चिमुकल्यांच्या आजीने देखील जगाचा निरोप घेतला. क्रूर नियती एवढ्यावरच थांबली नाही. चिमुकल्यानंतर आजी अन् मग आई अशा चार जणांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील बेडरफुलजवळ युवराज मोहन सिंग बलरामवाले (वय 40) यांचं कुटुंब वास्तव करत होते. त्यांच्या कुटुंबात पत्नी रंजना (वय 35), आई विमल (वय 60), मुलगा हर्ष (वय 6) आणि मुलगी अक्षरा (वय 4) अशा पाच जण होते. यापैकी चार जणांचा मृत्यू झाला आहे. यामधील आता युवराज मोहन सिंग बलरामवाले यांच्यावर उपचार सुरु आहेत.
सोलापूर शहरातील नळ बजार चौक बालाजी मंदिर परिसरात बलरामवाले कुटिंब राहत होतं. या परिसरातील पाच बाय दहा इतक्या छोट्याश्या खोलीत राहणाऱ्या बलरामवाले परिवारातील सदस्यांचा एकामागून एक मृत्यू झाला. शरीरात वाढत गेलेले कार्बन मोनॉक्साईडमुळे ऑक्सिजनची पातळी संपूर्णपणे नष्ट होऊन श्वसन प्रक्रिया बंद पडल्याने रंजनाबाईचा मृत्यू झाल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
मुलं आणि आजी या तिघांच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात मोदी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले होते. या तिघांवर अंत्यसंस्कार होत असताना चौथ्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंबातील इतर लोकांनी टाहो फोडला.
FAQ
सोलापूरमध्ये नेमकी काय घटना घडली?
सोलापूर शहरातील लष्कर परिसरातील नळ बजार चौक, बालाजी मंदिर परिसरात बलरामवाले कुटुंबाच्या घरात गॅस सिलेंडरच्या गळतीमुळे धक्कादायक दुर्घटना घडली. या घटनेत कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला, तर एका व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. मृतांमध्ये दोन चिमुकले, हर्ष (वय ६) आणि अक्षरा (वय ४), त्यांची आई रंजना (वय ३५), आणि आजी विमल (वय ६०) यांचा समावेश आहे.
गॅसगळतीचे कारण काय होते?
घरगुती गॅस सिलेंडरमधून गळती झाल्याने ही दुर्घटना घडली. कुटुंब राहत असलेली खोली ५ बाय १० फूट इतकी छोटी होती, ज्याला खिडकी नव्हती आणि दरवाजाही बंद होता. यामुळे गॅस खोलीत साचला आणि शरीरात कार्बन मोनॉक्साईड वाढल्याने ऑक्सिजनची पातळी कमी होऊन श्वसन प्रक्रिया बंद पडली.
ही घटना कधी घडली?
ही घटना ३०-३१ ऑगस्ट २०२५ च्या मध्यरात्री घडली. रात्री कुटुंब जेवण करून झोपले असताना गॅस गळती झाली आणि सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना उघडकीस आली.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.