
Sonalee Kulkarni: मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिच्या अभिनयाच्या जोरावर मराठीसह हिंदी आणि मल्याळम सिनेसृष्टीत ठसा उमटवला आहे. अनेक गाजलेल्या चित्रपटांमुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे. मात्र, यावेळी ती तिच्या सिनेमामुळे नाही तर एका राजकीय मुद्द्यावर दिलेल्या थेट प्रतिक्रियेने चर्चेत आली आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात राजकारणातील मोठी चर्चा म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची. दोघे एकत्र आल्यानंतर अनेक चर्चा रंगल्या. अशातच गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे कुटुंब राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. या भेटीनंतर ठाकरे बंधूंच्या जवळीकीबद्दल अनेक चर्चा रंगल्या. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीतही ठाकरे बंधू एकत्र येऊ शकतात अशा तर्कवितर्कांनाही उधाण आलं आहे.
ठाकरे बंधू एकत्र येण्यावर सोनाली काय म्हणाली?
याच पार्श्वभूमीवर अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला एका मुलाखतीत या विषयावर विचारलं गेलं. तिने ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितले की, ‘हे सध्या खूपच हायपोथेटिकल आहे. त्यामुळे काही ठाम सांगता येणार नाही. जोपर्यंत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे औपचारिक घोषणा करत नाहीत तोपर्यंत यावर विश्वास ठेवणं योग्य नाही. मात्र महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीसाठी हे एकत्र येणं फायद्याचं ठरेल असं वाटत असेल तर नक्कीच हे व्हावं आणि कायमस्वरूपी व्हावं.’ तिच्या या वक्तव्याची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. अभिनेत्री असूनही एका संवेदनशील राजकीय विषयावर तिने स्पष्ट मत व्यक्त केल्यामुळे नेटकरी तिचं कौतुक करत आहेत.
अभिनेत्रीच्या वक्तव्याची सर्वत्र चर्चा
सोनाली कुलकर्णीबद्दल सांगायचं झालं तर तिने ‘बकुळा नामदेव घोटाळे’ या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर तिने ‘नटरंग’, ‘पांडू’, ‘झिम्मा’, ‘मितवा’, ‘क्लासमेट्स’, ‘तमाशा’, ‘पोश्टर गर्ल’, ‘हिरकणी’ यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये तिने काम केलं.
तसेच हिंदी चित्रपटसृष्टीतही तिच्या अभिनयाची छाप पडली आहे. सध्या तिचं हे थेट आणि स्पष्ट वक्तव्य राजकीय वर्तुळासोबतच सिनेसृष्टीतही चर्चेचा विषय ठरत आहे.
FAQ
1. सोनाली कुलकर्णी यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याबाबत काय वक्तव्य केले आहे?
सोनाली कुलकर्णी यांनी ‘मुंबई तक’शी बोलताना सांगितले की, “राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याची चर्चा सध्या हायपोथेटिकल आहे. जोपर्यंत दोघेही औपचारिक घोषणा करत नाहीत, तोपर्यंत यावर विश्वास ठेवणे योग्य नाही. परंतु जर हे एकत्र येणे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, राजकीय आणि सामाजिक परिस्थितीसाठी फायदेशीर ठरणार असेल, तर ते नक्कीच व्हावे आणि कायमस्वरूपी व्हावे.”
2. सोनाली कुलकर्णी यांच्या वक्तव्याला सोशल मीडियावर कसा प्रतिसाद मिळाला?
सोनाली यांच्या स्पष्ट आणि संतुलित वक्तव्याचे सोशल मीडियावर, विशेषतः X वर, खूप कौतुक झाले आहे. नेटकऱ्यांनी अभिनेत्री असूनही संवेदनशील राजकीय विषयावर थेट मत व्यक्त केल्याबद्दल तिची प्रशंसा केली आहे. काहींनी तिच्या वक्तव्याला “प्रौढ आणि विचारपूर्वक” म्हटले आहे, तर काहींनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या शक्यतेवर चर्चा सुरू केली आहे.
3. ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चेचे कारण काय आहे?
गणेशोत्सव 2025 च्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे कुटुंब, ज्यात रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचा समावेश आहे, राज ठाकरे यांच्या घरी गेले होते. या भेटीमुळे राज ठाकरे (मनसे) आणि उद्धव ठाकरे (शिवसेना-UBT) एकत्र येण्याच्या आणि आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत (BMC) सहकार्य करण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.