digital products downloads

Success Story: इंजिनीअरिंग सोडून सुरु केला व्यवसाय, पुण्याच्या सुष्मिताने ‘अशी’ केली 50 लाखांची कमाई!

Success Story: इंजिनीअरिंग सोडून सुरु केला व्यवसाय, पुण्याच्या सुष्मिताने ‘अशी’ केली 50 लाखांची कमाई!

Sushmita Kaneri Success Story: उद्योग करण्याचा ध्यास घेतलेले अनेकजण आपल्याला हव्या त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी दिवसरात्र एक करतात.  पुण्यातील सुष्मिता कानेरीची कहाणीदेखील अशीच आहे. तिचं शिक्षण इंजिनिअरिंगचं झालं. पण तिला काहीतरी वेगळ करायचं होतं. सुष्मिताच्या कुटुंबातील सदस्य खूपच साधे आहेत. तिच्या पालकांनी नेहमीच कठोर परिश्रम आणि स्वावलंबनावर भर दिला. त्यांनी सुष्मिताला शहाणपणाचे निर्णय घेण्यास आणि दयाळू राहण्यास शिकवले. सुष्मिताने 2020 मध्ये विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (VIT) पुणे येथून सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली. त्यानंतर ती नोकरी करण्यास तयार झाली. पण शालेय जिवनापासून सामाजिक उद्योजक बनण्याची कल्पना तिच्या मनात होती.

व्यवसायाची कल्पना कशी आली?

‘मी शाळेत क्लास मॉनिटर होते. मी एकदा निधी संकलन मोहीम चालवत असताना माझ्या मित्रांकडून पैसे गोळा करून ते एका अनाथाश्रमाला दान करण्याचा विचार केला. आम्ही 500 रुपये गोळा केले आणि अनाथाश्रमातील मुलांसाठी स्टेशनरी खरेदी केली. अनेक लोक अडचणींना तोंड देत असल्याचे मला जाणावले. तेव्हापासून मला समाजासाठी काहीतरी करण्याची आणि स्वयंसेवी संस्थांसोबत काम करण्याची आवड निर्माण झाल्याचे’, सुष्मिता सांगते. या अनुभवामुळे तिला तंत्रज्ञान आणि सामाजिक कार्याद्वारे बदल घडवून आणण्याचा विचार मनात आला. मग शिक्षण पूर्ण केल्यानंतर तिला एक कठीण निर्णय घ्यावा लागला. तिच्याकडे नोकरीची ऑफर होती पण तिला तंत्रज्ञान आणि सामाजिक कार्य एकत्र करून काहीतरी करायचे होते.

गुलकारीची सुरुवात?

2021 मध्ये नोकरी करण्याऐवजी सुष्मिताने ‘ गुलकारी’ नावाचा क्राउडफंडिंग प्लॅटफॉर्म सुरू केला. त्यांचा उद्देश देणग्यांचा मागोवा घेणे आणि देणग्यांचा काय परिणाम होतो हे हे पाहणे हा होता. या उपक्रमामुळे लोकांना देणगी देण्याची संधी मिळाली पण फक्त देणगी देणे पुरेसे नाही, हे सुष्मिताच्या लक्षात आले. फक्त पैसे दान केल्याने काहीही होणार नाही. आपल्याला असे मार्ग शोधावे लागतील ज्याद्वारे लोक स्वावलंबी बनू शकतील आणि आयुष्यभर कमाई करू शकतील, हे माझ्या लक्षात आल्याचे सुष्मिका सांगते. यानंतर सुष्मिताने उपजीविकेवर आधारित क्राउडफंडिंगकडे लक्ष वळवले. गरजू लोकांना कायमस्वरूपी कमाईची संधी मिळू शकेल अशा मार्गांचा शोध तिने सुरू केला. भारतातील लुप्त होत चाललेल्या कलेकडे तिने लक्ष दिले.

2021 मध्ये बदल 

2021 मध्ये तिच्या आयुष्यात एक मोठा बदल झाला. ती तेलंगणाला गेली आणि तिथल्या निर्मल कलेच्या कलाकारांना भेटली. ही कला लाकडावर बनवली जाते आणि चित्रकलेच्या माध्यमातून कथा सांगितल्या जातात. ‘कलाकार अनेक पिढ्यांपासून ही कला साकारत आहेत. पण कोणालाही त्यांची कला आवडत नव्हती. त्यामुळे कलाकार निराश झाले. आपल्या कष्टांना योग्य किंमत मिळत नाही, असे त्यांना वाटल्याचे सुष्मिता सांगते.
माझ्या मुलाला ही कला शिकवशील का? असे मी त्यातील एकाला विचारले तेव्हा तो रागावला. तुमच्या मुलाला नोकरी शोधण्यास सांगा, असा सल्ला त्याने दिला. आपल्याला या पारंपारिक कला जतन करायच्या आहेत आणि कलाकारांना शाश्वत कमाई करण्याची संधी द्यायच्या आहेत, याची त्या क्षणी जाणिव झाल्याचे सुष्मिताने सांगितले. 

अशा प्रकारे झाली सुरुवात 

निर्मल कलाच्या कलाकारांच्या अडचणी पाहून सुष्मिता खूप दुःखी झाली. तिने आणखी एक वर्ष देशभर प्रवास केला आणि इतर कलाकारांना भेटली. त्यानंतर तिने एप्रिल 2023 मध्ये “गुलकारी” सुरू केली. हे एक असे व्यासपीठ आहे जे कलाकारांना ग्राहकांशी जोडते. एकत्र कला निर्माण करते आणि लुप्त होत चाललेल्या कलेबद्दल जागरूकता पसरवते. तसेच त्या माध्यमातून कलाकारांना शाश्वत कमाई करण्यास मदत होते. पारंपारिक कलेला आदर आणि मान्यता देणे हा गुलकारीचा उद्देश असल्याचे सुष्मिता सांगते. 

गुलकारीचे काम काय आहे?

गुलकारी पर्यावरणपूरक पॅकेजिंग वापरते. नाजूक उत्पादनांचे संरक्षण करण्यासाठी ते बबल रॅपऐवजी भुसासारख्या गोष्टी ते वापरतात. याशिवाय हस्तकलांची प्रामाणिकता सिद्ध करण्यासाठी कंपनी ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्याची योजना आखतेय. यामुळे ग्राहकांना ते खरे उत्पादने खरेदी करत असल्याचा आत्मविश्वास मिळेल. सुष्मिता भविष्यात गुलकारी आणखी मोठी करण्याचे स्वप्न पाहतेय. तिला समाजावर सकारात्मक परिणाम करायचाय.’आम्हाला कलाकारांना शाश्वत कमाई करण्याची, लुप्त होत चाललेली कलाकृती वाचवण्याची आणि जगभरातील लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी द्यायचीय. कलाकृती भारतीय संस्कृतीचा एक भाग राहील, याची आम्हाला खात्री करायची असल्याचे सुष्मिता सांगते. 

15 कॉर्पोरेट्ससोबत भागीदारी 

2024 मध्ये गुलकारीने 4 हजारहून अधिक हस्तकला वस्तू विकल्या. फक्त 2 वर्षांतच त्यांचे उत्पन्न 50 लाख रुपयांपर्यंत पोहोचले. ‘आम्ही 15 कॉर्पोरेट्ससोबत भागीदारी केलीय. आम्ही त्यांना उत्पादनेच विकण्यासोबतच त्यांच्यासाठी कार्यशाळादेखील आयोजित करतो. या कार्यशाळांमध्ये कलाकार त्यांची कला समजावून सांगतात आणि त्यासाठी मोफत प्रशिक्षण घेतात, अशी माहिती सुष्मिताने दिली.

Doonited Affiliated: Syndicate News Hunt

This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.

Source link

Uniq Art Store India

Related posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Uttarakhand News Doonited
Social media & sharing icons powered by UltimatelySocial
Instagram
WhatsApp