Success Story: जर एखाद्या व्यक्तीने पूर्ण समर्पणाने कठोर परिश्रम केले तर त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कधीकाळी मजूर म्हणून काम करणारा इसम मोठा व्यावसायिक होऊन इतरांना प्रशिक्षण देईल, हे सांगून त्यावेळी कोणाला खरे वाटले नसते. पण प्रामाणिक प्रयत्न आणि त्यात ठेवलेल्या सातत्यामुळे हे खरं करुन दाखवलंय. आपण आज दीपक सिंह यांची कहाणी जाणून घेणार आहोत. महात्मा गांधी नरेगा योजनेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या प्रकल्प उन्नतीबद्दल अनेकांना माहिती नसेल. या प्रकल्पामुळे छत्तीसगडच्या मुंगेली जिल्ह्यातील पथरिया विकास ब्लॉकमधील हथनिकला गावातील दीपक सिंग यांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली. ही योजना केवळ दीपकसाठीच नव्हे तर इतर गावकऱ्यांसाठीही फायदेशीर ठरतेय.
‘उन्नती’ हा एक कौशल्य विकास प्रकल्प आहे. महात्मा गांधी नरेगा लाभार्थ्यांचे कौशल्य ज्ञान वाढवणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे आहे, हे या या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. यामुळे तरुण सध्याच्या अर्धवेळ रोजगारापासून पूर्णवेळ रोजगाराकडे वळू शकले आहेत. त्यामुळे महात्मा गांधी नरेगावरील त्यांचे अवलंबित्व कमी होईल. हा प्रकल्प स्वयंरोजगार किंवा मजुरी रोजगारासाठी कौशल्ये पुरवत असून महात्मा गांधी नरेगा लाभार्थ्यांचे जीवनमान यामुळे सुधारु लागले आहे.
हा प्रोजेक्ट परिवारातील 18 ते 45 वर्षाच्या सदस्याला प्रशिक्षण देण्यासाठी आहे. ज्याने प्रकल्प सुरु होण्याच्या मागील आर्थिक वर्षात महात्मा गांधी नरेगा अंतर्गत 100 दिवस काम पूर्ण करणे आवश्यक असते. ज्या कुटुंबांमधून प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड केली जाते त्यांना महात्मा गांधी नरेगा अंतर्गत 100 दिवसांचा रोजगार दिला जातो. प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना प्रकल्पाच्या तरतुदींनुसार संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशात प्रचलित वेतन दरांनुसार जास्तीत जास्त 100 दिवसांच्या कालावधीसाठी आणि प्रति कुटुंब एक कार्यक्रमासाठी दैनिक वेतन दिले जाते. वेतन नुकसान भरपाई म्हणून स्टायपेंडचा संपूर्ण खर्च पूर्णपणे केंद्र सरकार करते. या प्रकल्पांतर्गत 26 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये तीन वर्षांच्या कालावधीत एकूण 2 लाख लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
स्वयंरोजगार प्रशिक्षण
प्रकल्प उन्नती अंतर्गत गावकरी स्वावलंबी व्हावेत म्हणून शेळीपालन, पशुपालन, कृषी सखी, पशुसखी आणि डुक्कर पालन अशा विविध स्वयंरोजगार उपक्रमांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. एका साध्या शेतकरी कुटुंबातील दीपक सिंग गे पूर्वी पूर्णपणे शेती आणि मनरेगाच्या मजुरीवर अवलंबून होते. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. पण त्यांनी आपल्या कठोर परिश्रमाने आणि दृढनिश्चयाने परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला.
10 दिवसांचे कुक्कुटपालन प्रशिक्षण
छत्तीसगड सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा जिल्हा प्रशासनाने प्रोजेक्ट उन्नती अंतर्गत कुक्कुटपालन प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला तेव्हा दीपक हे त्यात सहभागी झाले. त्यांनी बिलासपूर येथील ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत वैज्ञानिक कुक्कुटपालनाचे 10 दिवसांचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना व्यावसायिक कुक्कुटपालनाबद्दल तांत्रिक ज्ञान मिळाले. प्रशिक्षणानंतर दीपक यांनी बचत आणि मनरेगातून मिळालेल्या पैशाचा वापर करून 10 कोंबड्यांपासून सुरुवात केली. हळूहळू त्यांनी आपले उत्पन्न वाढवले आणि अधिक कोंबड्या विकत घेतल्या. काही काळात त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले. त्यांचा छोटासा व्यवसाय आता एका यशस्वी उपक्रमात रूपांतरित झालाय.
एक लाख रुपयांपासून बनवले पोल्ट्री शेड
वाढत्या उत्पन्नाचा विचार करून दीपकने 1 लाख रुपये खर्च करुन एक आधुनिक पोल्ट्री शेड बांधले. ज्यामध्ये आता 450 कोंबड्या आहेत. यामुळे त्यांचे उत्पन्न तर वाढलेच पण गावातील इतर लोकांनाही रोजगाराच्या संधी मिळू लागल्या. आता कोंबडी खरेदी करण्यासाठी दूरच्या शहरात जाण्याऐवजी गावकरी थेट दीपक यांच्याकडून खरेदी करतात. ज्यामुळे ग्रामीण समुदायालाही फायदा होतोय. जर एखाद्या व्यक्तीने पूर्ण समर्पणाने कठोर परिश्रम केले तर त्याला यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. कधीकाळी मजूर म्हणून काम करणारा इसम मोठा व्यावसायिक होऊन इतरांना प्रशिक्षण देईल, हे सांगून त्यावेळी कोणाला खरे वाटले नसते. पण प्रामाणिक प्रयत्न आणि त्यात ठेवलेल्या सातत्यामुळे हे खरं करुन दाखवलंय. आपण आज दीपक सिंह यांची कहाणी जाणून घेणार आहोत. महात्मा गांधी मनरेगा योजनेअंतर्गत चालवल्या जाणाऱ्या प्रकल्प उन्नतीबद्दल अनेकांना माहिती नसेल. या प्रकल्पामुळे छत्तीसगडच्या मुंगेली जिल्ह्यातील पथरिया विकास ब्लॉकमधील हथनिकला गावातील दीपक सिंग यांच्या जीवनाला एक नवीन दिशा मिळाली. ही योजना केवळ दीपकसाठीच नव्हे तर इतर गावकऱ्यांसाठीही फायदेशीर ठरतेय. ‘उन्नती’ हा एक कौशल्य विकास प्रकल्प आहे. महात्मा गांधी नरेगा लाभार्थ्यांचे कौशल्य ज्ञान वाढवणे आणि त्यांचे जीवनमान सुधारणे आहे, हे या या प्रकल्पाचे उद्दिष्ट आहे. यामुळे तरुण सध्याच्या अर्धवेळ रोजगारापासून पूर्णवेळ रोजगाराकडे वळू शकले आहेत. त्यामुळे महात्मा गांधी नरेगावरील त्यांचे अवलंबित्व कमी होईल. हा प्रकल्प स्वयंरोजगार किंवा मजुरी रोजगारासाठी कौशल्ये पुरवत असून महात्मा गांधी नरेगा लाभार्थ्यांचे जीवनमान यामुळे सुधारु लागले आहे.
हा प्रोजेक्ट परिवारातील 18 ते 45 वर्षाच्या सदस्याला प्रशिक्षण देण्यासाठी आहे. ज्याने प्रकल्प सुरु होण्याच्या मागील आर्थिक वर्षात महात्मा गांधी नरेगा अंतर्गत 100 दिवस काम पूर्ण करणे आवश्यक असते. ज्या कुटुंबांमधून प्रशिक्षणासाठी उमेदवारांची निवड केली जाते त्यांना महात्मा गांधी नरेगा अंतर्गत 100 दिवसांचा रोजगार दिला जातो. प्रशिक्षण घेणाऱ्या उमेदवारांना प्रकल्पाच्या तरतुदींनुसार संबंधित राज्य/केंद्रशासित प्रदेशात प्रचलित वेतन दरांनुसार जास्तीत जास्त 100 दिवसांच्या कालावधीसाठी आणि प्रति कुटुंब एक कार्यक्रमासाठी दैनिक वेतन दिले जाते. वेतन नुकसान भरपाई म्हणून स्टायपेंडचा संपूर्ण खर्च पूर्णपणे केंद्र सरकार करते. या प्रकल्पांतर्गत 26 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेशांमध्ये तीन वर्षांच्या कालावधीत एकूण 2 लाख लाभार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे.
स्वयंरोजगार प्रशिक्षण
प्रकल्प उन्नती अंतर्गत गावकरी स्वावलंबी व्हावेत म्हणून शेळीपालन, पशुपालन, कृषी सखी, पशुसखी आणि डुक्कर पालन अशा विविध स्वयंरोजगार उपक्रमांमध्ये प्रशिक्षण दिले जात आहे. एका साध्या शेतकरी कुटुंबातील दीपक सिंग गे पूर्वी पूर्णपणे शेती आणि मनरेगाच्या मजुरीवर अवलंबून होते. त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. पण त्यांनी आपल्या कठोर परिश्रमाने आणि दृढनिश्चयाने परिस्थिती बदलण्याचा निर्णय घेतला.
10 दिवसांचे कुक्कुटपालन प्रशिक्षण
छत्तीसगड सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जेव्हा जिल्हा प्रशासनाने प्रोजेक्ट उन्नती अंतर्गत कुक्कुटपालन प्रशिक्षणासाठी पुढाकार घेतला तेव्हा दीपक हे त्यात सहभागी झाले. त्यांनी बिलासपूर येथील ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्थेत वैज्ञानिक कुक्कुटपालनाचे 10 दिवसांचे प्रशिक्षण घेतले. या प्रशिक्षणादरम्यान त्यांना व्यावसायिक कुक्कुटपालनाबद्दल तांत्रिक ज्ञान मिळाले.
10 कोंबड्यांपासून सुरुवात
प्रशिक्षणानंतर दीपक यांनी बचत आणि मनरेगातून मिळालेल्या पैशाचा वापर करून 10 कोंबड्यांपासून सुरुवात केली. हळूहळू त्यांनी आपले उत्पन्न वाढवले आणि अधिक कोंबड्या विकत घेतल्या. काही काळात त्यांना त्यांच्या कष्टाचे फळ मिळाले. त्यांचा छोटासा व्यवसाय आता एका यशस्वी उपक्रमात रूपांतरित झालाय.
एक लाख रुपयांपासून बनवले पोल्ट्री शेड
वाढत्या उत्पन्नाचा विचार करून दीपकने 1 लाख रुपये खर्च करुन एक आधुनिक पोल्ट्री शेड बांधले. ज्यामध्ये आता 450 कोंबड्या आहेत. यामुळे त्यांचे उत्पन्न तर वाढलेच पण गावातील इतर लोकांनाही रोजगाराच्या संधी मिळू लागल्या. आता कोंबडी खरेदी करण्यासाठी दूरच्या शहरात जाण्याऐवजी गावकरी थेट दीपक यांच्याकडून खरेदी करतात. ज्यामुळे ग्रामीण समुदायालाही फायदा होतोय.
Doonited Affiliated: Syndicate News Hunt
This report has been published as part of an auto-generated syndicated wire feed. Except for the headline, the content has not been modified or edited by Doonited.